शेजारीण काकू शिल्पाः काय हो आजोबा, तुमची सून डिलिवरी गर्लचे काम करते म्हणे?
आजोबाः हॅ. शक्यच नाही. श्रेयस ? मेघना ? जरा बाहेर या बरं.
(श्रेयस मेघना बाहेर येतात)
श्रेयसः काय झालं बाबा?
शिल्पाः विचारा आता. (मेघनाकडे बघत तोंड वेडावत चिडवत) डिलिवरी गर्ल. हं…
(श्रेयस शिल्पाकडे बघून दुर्लक्ष करून प्रमोदकडे बघत) प्रमोदः काय रे श्रेयस. तुझी बायको डिलिवरी गर्लचे काम करते? खरं आहे का?
मेघनाः हो! मी डिलिवरी गर्लचे काम करते.
शिल्पाः बघाऽऽऽऽ (हात गोलाकार फिरवत चिडवत)
श्रेयसः ओऽ काकू. काय चाललंय?
सिद्धीः आई, डिली… डिली… म्हणजे काय गं?
देवांशः मला पण सांग ना.
प्रमोदः हे जेवण सामान घराघरात पोचवतात ना ते.
शिल्पाः बायांनी असं घरोघरी फिरायचं? लोकं थुंकतील तुमच्यावर…
प्रमोदः श्रेयस, अरे आपली इज्जत काय राहणार?
श्रेयसः कसली इज्जत? गल्लीबाहेर आपल्याला कोण तरी ओळखते का?
मेघनाः मला मुलांना खुप शिकवायचंय. ह्यांचा पगार पुरतो का आपल्याला?
श्रेयसः आणि काकू. तुम्ही कोण सांगणाऱ्या? माझी बायको काय पण काम करेल. सरळ चालू लागा…
(देवांश सिद्धी दोघे श्रेयस मेघनाला बिलगतात. शिल्पा नाक मुरडते आणि रागाने पाय आपटत बाहेर जाते)
#pramodwaghmare #actingpramod
(C) Pramod Waghmare