सकाळी सकाळी मला माझ्या क्लायंटचा फोन आला. “गुड मॉर्निंग सर. तुम्ही कसे आहात?” मी बोललो.
क्लायंट फोन वर,” ऐका ना. मी जी इंश्युरंस पॉलिसी काढलीय ती मला अर्जंट हवी आहे.”
मी बोललो,” यस्सर. मी आजच पोस्ट करतो. दोन चार दिवसांत तुम्हाला मिळून जाईल.”
“नाही मला ती आजच पाहिजे. माझ्या घरी माझी आई असेल. तिला १२ वाजण्यापूर्वी देऊन या.” म्हणून त्यांनी फोन कट केला.
कमाल असतात हे क्लायंट्स. कधी पाॅलिसीबद्दल विचारत पण नाहीत आणि कधी एवढी घाई करतात... चला असं होतंच.
मी पाॅलिसीचे सर्व डाॅक्युमेंटस् घेतले आणि क्लायंटच्या घरी पोहोचलो. काही लोकं बसली होती. घरात उदास वातावरण होतं.
क्लायंटची म्हातारी आई मला भेटायला आली. एक सात आठ वर्षांची छोटी मुलगी तिच्या सोबत होती.
“आई, मी इंश्युरंस कंपनीमधून आलो आहे. तुमच्या मुलाने आमच्या कंपनीत मागच्या महिन्यात एक करोडचा लाईफ इंश्युरंस आणिमुलीच्या शिक्षणासाठी पन्नास लाखांची पाॅलिसी केली होती. सकाळी तुमच्या मुलाचा फोन आला होता. तुम्हाला अर्जंट पाॅलिसीडाॅक्युमेंटस् द्यायला सांगितलं होतं. ते आज घरात नाहीत वाटतंय.” मी बोललो.
आईच्या डोळ्यात पाणी आलं,” माझा मुलगा आणि सून आता या जगात नाहीत. चार दिवसांपूर्वी कार ॲक्सिडंटमध्ये...”
त्याच वेळी माझं लक्ष काॅर्नरला ठेवलेल्या दोघांच्या फोटोवर गेलं.
“ओह सो साॅरी. मला माफ करा. सकाळी आपल्या घरातून कोणीतरी फोन केला असेल.” मी बोललो.
“मला एकच मुलगा होता. आणि या पाॅलिसीबद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही.”
मी त्यांना पाॅलिसी डाॅक्युमेंटस् दिले आणि त्यांना सांगितलं की काही दिवसांतच आम्ही त्यांना पाॅलिसीचे पैसे देऊ.
त्यांच्या घरातून बाहेर पडताना मी हाच विचार करत होतो की मला फोन कोणी केला होता ?
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/