Sunday, April 19, 2020

फोन कॉल (मराठी)

सकाळी सकाळी मला माझ्या क्लायंटचा फोन आला. “गुड मॉर्निंग सरतुम्ही कसे आहात?” मी बोललो.

क्लायंट फोन वर,” ऐका नामी जी इंश्युरंस पॉलिसी काढलीय ती मला अर्जंट हवी आहे.”

मी बोललो,” यस्सरमी आजच पोस्ट करतोदोन चार दिवसांत तुम्हाला मिळून जाईल.”

नाही मला ती आजच पाहिजेमाझ्या घरी माझी आई असेलतिला १२ वाजण्यापूर्वी देऊन या.” म्हणून त्यांनी फोन कट केला.

कमाल असतात हे क्लायंट्सकधी पाॅलिसीबद्दल विचारत पण नाहीत आणि कधी एवढी घाई करतात... चला असं होतंच.

मी पाॅलिसीचे सर्व डाॅक्युमेंटस् घेतले आणि क्लायंटच्या घरी पोहोचलोकाही लोकं बसली होतीघरात उदास वातावरण होतं.

क्लायंटची म्हातारी आई मला भेटायला आलीएक सात आठ वर्षांची छोटी मुलगी तिच्या सोबत होती.

आईमी इंश्युरंस कंपनीमधून आलो आहेतुमच्या मुलाने आमच्या कंपनीत मागच्या महिन्यात एक करोडचा लाईफ इंश्युरंस आणिमुलीच्या शिक्षणासाठी पन्नास लाखांची पाॅलिसी केली होतीसकाळी तुमच्या मुलाचा फोन आला होतातुम्हाला अर्जंट पाॅलिसीडाॅक्युमेंटस् द्यायला सांगितलं होतंते आज घरात नाहीत वाटतंय.” मी बोललो.

आईच्या डोळ्यात पाणी आलं,” माझा मुलगा आणि सून आता या जगात नाहीतचार दिवसांपूर्वी कार ॲक्सिडंटमध्ये...”

त्याच वेळी माझं लक्ष काॅर्नरला ठेवलेल्या दोघांच्या फोटोवर गेलं.

ओह सो साॅरीमला माफ करासकाळी आपल्या घरातून कोणीतरी फोन केला असेल.” मी बोललो.

मला एकच मुलगा होताआणि या पाॅलिसीबद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही.”

मी त्यांना पाॅलिसी डाॅक्युमेंटस् दिले आणि त्यांना सांगितलं की काही दिवसांतच आम्ही त्यांना पाॅलिसीचे पैसे देऊ.

त्यांच्या घरातून बाहेर पडताना मी हाच विचार करत होतो की मला फोन कोणी केला होता ?


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

https://www.facebook.com/pramodplanet/



इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...