Thursday, April 9, 2020

दर वर्षी लॉकडाऊन (मराठी)

आरामात पुस्तक वाचत होतोतेवढ्यात माझी मुलं काॅलेजची ॲानलाईन लेक्चर्स पूर्ण करून माझ्या जवळ आली.

आपण हे लाॅकडाऊन दर वर्षी करू शकू का?” माझ्या मुलीचा प्रश्न.

हे आपण करू शकत नाही.” मी बोललो.

का नाहीप्रदुषण किती कमी झालंयएवढी स्वच्छ हवाएवढं शुद्ध पाणी.” मुलगा बोलला.

सर्व इंडस्ट्रीज बंद पडतीलजगाची अर्थव्यवस्था बिघडून जाईलहे शक्य नाही.” मी बोललो.

जर आपण दर वर्षी फक्त एक आठवडा साऱ्या जगात लाॅकडाऊन करू शकलो तर?” मुलगी बोलली.

सर्व जग एक आठवडा बंद?” मी विचारलं.

आपण एक वर्ष आधीच पुढच्या वर्षाचा लाॅकडाऊनचा एक आठवडा डिसाईड करायचाज्यावेळी सर्व काही बंद राहीलसर्व जणमिळून तो आठवडा ठरवतील ज्यामुळे सण आणि सर्व गोष्टींचा विचार करून प्लॅनिंग करू शकू.” मुलगा बोलला.

ओकेमग?”

त्यामुळे सर्व इंडस्ट्रीज शाळा काॅलेजेस आधीच आपल्या कामांचे प्लॅनिंग करू शकतीलअत्यावश्यक सेवासुद्धा प्लॅन करता येतीलकोणतीही कंपनी चालणार नाहीकोणती गाडी सुद्धा रस्त्यावर येणार नाही.” मुलगी बोलली.

मग तर सगळे सुट्टी समजून फिरायला जातील.” मी.

टूरिस्ट जागांवरही कोणतीच गाडी चालणार नाहीतुम्हाला तिथे पण हाॅटेलमध्येच रहावं लागेलहो पण पायी तुम्ही कुठेही फिरूशकाल.” मुलगा बोलला.

मुलांच्या बोलण्यात खरेपणा तर होताच.

प्रामाणिकपणे आणि विश्वासाने केलं तर हे शक्य होऊ शकतंआपण भारतीय याचा प्रारंभ करू शकतो आणि जगासमोर एक चांगलंउदाहरण ठेऊ शकतो.” मी बोललो.


आपके अभिप्राय ज़रूर लिखें 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


#pramodplanet #pramodwaghmare 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...