Friday, April 17, 2020

हा नवीन जमाना आहे मित्रा... पार्ट २ (मराठी)

तुम्ही मला बोलवलंतइथलं काम समजलेच असेल.” ट्रान्सफर होऊन आलेल्या नव्या अधिकाऱ्याला जून्या अधिकाऱ्याने विचारले.

"हो नादहा दिवसांत थोडं समजलंय.” नवे अधिकारी बोलले.

"सरमी आत येऊ?” आवाज ऐकून दोघांनी दरवाजाकडे बघितलेतो तर तोच माणुस होता ज्याचा चेक जून्या अधिकाऱ्याने दोन वर्षेअडवला होता.

"याहा घ्या तुमचा चेक.” नव्या अधिकाऱ्याने त्यांना चेक दिला.

चेक बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेते बोलले,” मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.”

नवे अधिकारी बोलले,” त्यात उपकार कसलेहे तर माझे कर्तव्य आहे.”

तो माणुस चेक घेऊन जाताच जूने अधिकारी नव्या अधिकाऱ्यांना रागाने बोलले,” हे काय केलंततुम्हाला मी सांगितलं होतंमोठ्यासाहेबांनी सांगितलं होतं चेक थांबवण्यासाठी.”

नवे अधिकारी बोलले,” हा चेक थांबवण्याचे कोणतेही कारण मला दिसले नाहीआणि मोठ्या साहेबांच्या पर्सनल गोष्टी आपल्याकामात  आल्या तर चांगले.”

नव्या अधिकाऱ्यांच्या उत्तराने जूने अधिकारी अजूनच भडकले,” चुकीचं आहे हेमोठ्या साहेबांना हे बिलकुल आवडणार नाही.”

अतिशय शांतपणे नव्या अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर दिले,” मोठे साहेब माझ्या चांगल्या कामावर  माझ्यावर खुश झालेलं मला जास्तआवडेलना की... आणि खरं खोटं पाप पुण्य काय आहे हे मला माहित आहेहा नवीन जमाना आहे माझ्या मित्रा ...”


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

https://www.facebook.com/pramodplanet/

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...