“सर, प्लीज तुम्ही माझे पैसे देऊन टाका. मी लोन घेतलंय. दोन वर्षे हप्ते भरून माझी साठवलेली जमा रक्कमही संपलीय. प्लीज.” तोविनवण्या करत अधिकाऱ्याशी बोलला.
अधिकारी बोलले,” तुम्हाला माहितीच आहे की मी तुमच्यासाठी किती प्रयत्न करत आहे. या महिन्यात तुमचं काम होऊन जाईल.”
“सर, आता दोन वर्षे होत आली. प्लीज देऊन टाका.” हात जोडत तो केबिन बाहेर गेला.
“मित्रा, यांचं काम तर किती सोपं आहे. मला समजत नाही. तू त्यांचं काम करत का नाहीस?” केबिन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याच्यामित्राने त्याला विचारले.
“काय करू मित्रा. आपले मोठे साहेब आहेत ना ते यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी सांगितलंय थांबवायला. त्यांची काही दुश्मनी असेलयांच्याशी.” अधिकारी बोलले.
मित्र बोलला,” पण त्या त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत. या कामात त्याचा काय संबंध? तो व्यक्ती अडचणीत दिसत आहे. तू जे करतोय तेमला चूक वाटतंय, पाप वाटतंय.”
अधिकारी जोराने हसत बोलले,” मित्रा, कोणत्या जमान्यात राहतोय तू? मोठ्या साहेबांनी बऱ्याच वेळा माझी मदत केलीय. आणि पुढेहीते माझ्या कामास येतील. खरं खोट पाप पुण्य ? हा नवीन जमाना आहे माझ्या मित्रा ...”
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare