Wednesday, October 30, 2019

तेल भी गिरना नहीं चाहिये...(हिंदी)

एक लोककथा हैं 

इक बार एक राजा ने अपने नये सरदार की परीक्षा ली  राजाने उसे एक कटोरेमें तेल दिया और अपने राजमहल के पुरे बगीचेंमे घुम आनेको कहा 

सरदार बगीचेमें घुमके वापस आया 

राजा ने देखा की कटोरेंमें तेल जैसे के तैसा था।

राजाने सरदारसे पुछा, “अब मुझे बताओ तुमने बगीचेमें क्या क्या देखा?”

सरदार बोला, “मेरा ध्यान तो पुरा तेल पे थातो मैंने बगीचेमें कुछ नहीं देखा 

राजा बोला, “ठीक है  तो एक बार फिर से घुम के आओ 

थोडी बार सरदार वापस आया  इस बार सरदारनें बगीचेमें देखी हर सुंदर चीज़ विस्तार से बताई 

राजा बोला, “ बराबर हैपर कटोरेमें तेल कहाँ है?”

सरदारने देखा  बगीचा देखते देखते तेल रास्ते में गीर गया था 

राजा बोला, “बगीचा देखना जरूरी है पर साथ में तेल भी गिरना नहीं चाहिये 

ज़िंदगी में काम करते करते हम अपने छोटे छोटे ख़ुशी के पल जानेअंजाने नज़रअंदाज़ कर देते है  ये दोनों चीजें हमारी ज़िंदगी बनाती है

उसी तरह प्रगतिकी होड़ में हम सब अपनी इस खूबसूरत पृथ्वी का विनाश तो नहीं कर रहे ये देखना आवश्यक है !!!

प्रमोद वाघमारे


#pramodplanet #growforests

तेल पण सांडवायचं नव्हतं...(मराठी)


एक लोककथा आहे

एकदा एका राजाने आपल्या नव्या सरदाराची परीक्षा घ्यायचे ठरविलेत्याने एका वाडग्यात तेल भरले आणि सरदाराला राजवाड्या भोवतालच्या बागेत पूर्ण फिरून यायला सांगितलं.

सरदार त्या बागेत फिरून परत आला.

राजा ने बघितले की वाडग्यातले तेल जसेच्या तसे होते.

राजाने सरदाराला विचारले, “ आता मला सांगबागेत तू काय काय बघितलेस ?”

सरदार बोलला,” माझे पुर्ण लक्ष तेलावर होतेत्यामुळे मी बागेत काहीच बघितले नाही.”

राजा, “ठीक आहेतू पुन्हा एकदा बागेत फिरून ये.”

थोड्या वेळात सरदार परत आलाया वेळी त्याने राजाला बागेत बघितलेल्या प्रत्येक सुंदर गोष्टींचं विस्ताराने वर्णन केलं.

राजा बोलला, “ते बरोबर आहेपण वाडग्यातले तेल कोठे आहे?”

सरदाराचे बघितलेबाग बघतां बघतां तेल रस्त्यात सांडले होते.

राजा बोलला, “बाग बघणे आवश्यक होतंच पण तेल पण सांडवायचं नव्हतं.”

आयुष्यात काम करता करता आनंदाचे छोटे छोटे क्षण आपण जाणते अजाणतेपणे दुर्लक्षित करतोया दोन्ही गोष्टी आपले आयुष्य घडवत असतात.

त्याचप्रमाणे प्रगतिच्या या शर्यतीत आपण सर्व आपल्या या सुंदर पृथ्वीचा विनाश तर करत नाही ना हे पण बघणे खुप आवश्यक आहे!!!


प्रमोद वाघमारे


#pramodplanet #growforests

Monday, October 14, 2019

माणूस किती काळ टिकेल?

माझी मुलगी आणि तिच्या मैत्रीणीचं जोरात डिस्कशन चाललं होतं.

मला बघून तिची मैत्रिण म्हणाली, “ अंकल, माणूस किती काळ टिकू शकेल?”

मी: “काय झालं मुलांनो?”

मैत्रिण: “आता पृथ्वीचं टेम्परेचर २ डिग्री ने वाढतंय.”

मी: “मग?”

मुलगी: “आर्टिक्टचा बर्फ वितळतोय.”

मी: “ओके.”

मैत्रिण: “समुद्राची पातळी वाढतेय. पोलर बेअर आणि कितीतरी पशुपक्ष्यांसाठी धोकादायक परिस्थिती आहे.”

मी: “बरं.”

मुलगी: “ दिल्लीत स्वच्छ हवेसाठी एअर प्युरिफायर वापरावे लागत आहेत.”

मैत्रिण: “तेच तर. जर टेम्परेचर ५५-६० डिग्री झालं आणि पृथ्वीवरचं प्रदूषण असंच वाढत राहीलं, तर माणूस टिकू शकेल का?”

मी: “खरी गोष्ट आहे मुलांनो. महाकाय डायनासोर नामशेष झाले, कितीतरी पशुपक्षी आता दिसतही नाहीत. खरोखरच या बदलत्या वातावरणात माणुस टिकू शकेल का?”

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests

क्या इन्सान टीक पायेगा?


मेरी बेटी और उसकी दोस्त के बीच कुछ डीस्कशन चल रहा था ।

मुझे देखतेही दोस्त बोली ‘अंकल, क्या इन्सान टीक पायेगा?’

मैं: “क्या हुआं बच्चों?”

दोस्त: “अभी पृथ्वी का टेम्परेचर २ डिग्री से बढने वाला है ।”

मैं: “तो क्या?”

बेटी: “आर्टिक्ट का बर्फ पिघल रहा है ।”

मैं: “ ओके।”

दोस्त: “समुद्र की लेवल बढ रहीं है । पोलर बेअर और कुछ और जीव ख़तरे में है ।”

मैं : “हूँ ।”

बेटी: “दिल्ली में साँस लेने के लिये एअर प्युरिफ़ायर लगाने पड़ रहे हैं ।”

दोस्त: “तो वहीं बात है। अगर टेम्परेचर ५५-६० डिग्री हो जाये और पृथ्वीपर प्रदूषण इस तरह ही बढता रहें, तो इन्सान टीक पायेगा क्या?”

मैं: “सच बात कहीं बच्चों । विशाल महाकाय डायनासोर ख़त्म हो गये, कईं पशुपक्षी अब दिखते नहीं । क्या इस बदलते वातावरण में इन्सान टीक पायेगा? “

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests

Wednesday, October 9, 2019

जंगल वाढवा #growforests

जंगल वाढवा  #growforests

तीन चांगल्या बातम्या

1. आयर्लंड प्रत्येक वर्षी २ कोटी २० लाख झाडे लावणार आहे. २०४० पर्यंत एकुण ४४ कोटी झाडे लावून पर्यावरण बदलाचा (climate change) सामना करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

2. चीनने आपले ६० हजार सैनिक झाडे लावण्यासाठी पाठवण्याचे ठरविले आहे. बिजींग जवळील हबे Hebei province येथे हे वृक्षारोपण चालू करण्यात येणार आहे. जंगलांची वाढ करून हवेचे प्रदूषण कमी करण्याचा उद्देश आहे. धूर आणि धुके smog बीजिंग शहर त्रस्त आहे.

3. सदगुरू आणि इशा फाऊंडेशन यांनी कावेरी काॅलिंग Cauvery Calling हे अभियान चालू केले आहे. ज्यात शेतकर्यांच्या मदतीने २४२ कोटी झाडे कावेरी नदीच्या परिसरात Cauvery basin अॅग्रोफाॅरेस्ट्री अंतर्गत लावण्याचे ठरविले आहे. जमिनीची पोत सुधारणे, जमिनीतली जलपातळी Ground water level वाढविणे आणि शेतकर्यांचे उत्पन्न पुढील ५ ते ७ वर्षात ३०० ते ८०० टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

भारतात खाजगी कंपन्यांच्या मदतीने जंगल वन क्षेत्र वाढवू शकतो. आपण शेकडो एकर जमिन खाजगी कंपन्या/ शैक्षणिक संस्था/ सहकारी संस्था/ एनजीओंना खुप कमी किमतीत देतो. आपण जमिन देतानाच जर कलम टाकले ज्यानुसार दिलेल्या जमिनीपैकी १० टक्के जमिन त्यांनी दाट वनामध्ये Very Dense Forest (७५% पेक्षा जमिनींवर झाडे) रूपांतरित करावी आणि ते वन जंगल राखण्याची जबाबदारी त्या कंपनी/ट्रस्ट/एनजीओंना द्यावी. नक्की याचा फायदा होऊ शकतो !!!

Pramod Waghmare

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests

Grow Forests #growforests

Three very positive news

  1. Ireland will plant around 2 Crore 20 Lakh plants every year. They hope that they will reach 44 Crore plants across country by the year 2040 to combat Climate Change.
  2. China has reportedly reassigned over 60,000 soldiers to plant trees in a bid to combat pollution by increasing the country's forest coverage. It will be started from Hebei province, which encircles Beijing. The area is known to be a major culprit for producing the notorious smog which blankets the capital city. 
  3. Sadhguru and the Isha Foundation by their campaign Cauvery Calling will support farmers to plant 242 crore trees in Cauvery basin by adopting agroforestry. Improving soil health, Reviving the river and groundwater levels, increase farmers’ incomes 300-800% in 5-7 years.

India can involve Private companies in growing forests. We give hundreds of acres of land to Private companies/ Educational Trusts/ NGOs at very cheap rates. Why don’t we put a clause to grow Very Dense Forest (means more than 75% plants coverage) in 10% of area allotted to them and responsibility of maintaining the forest will be on that company/ trust/ NGO. It will certainly help !!!

Pramod Waghmare

#pramodplanet #growforests


(C) Pramod Waghmare

Tuesday, October 8, 2019

नेचर गया...

रविवार की मस्त सुबह । आरामसे लेट उठा । कल रात पार्टीमें थोडा ज्यादाही लेट हो गया था ।

‘यार लाईफ हो तो ऐसी’ ऐसे सोचते हुए अपने मुलायम बिस्तरसे बाहर निकला और अपना कर्तव्य याद आया
‘यार, दो राऊंड तो मारने ही है ।’

तैय्यार हो के इक्कीसवें फ्लोरसे चकचकाती लिफ्टसें निचे उतरके इटैलियन मार्बल के आलीशान लॉबी से सोसायटी के गार्डन तक पोहोंचते पोहोंचते ‘लाईफ़ हो तो ऐसी’ गुनगुना रहा था ।

सामने गार्डनमें बहुत सारे इन्सान इकठ्ठे हुए थे। कुछ सजधज के आये तो कुछ सिधे बिस्तरसे उतरके आये थे । उनमेंसे तो कुछ महिनोंतक दिखते नही ऐसे थे ।सब ज़ोर शोर से कुछ बातें कर रहे थे । एक ‘ज़िम्मेदार नागरीक’ होने के कारण मैं भी उस झुंड में घुस गया ।

इन्सान १ “अरे राजा हुआ तो क्या हुआ? शेरसिंग राजा कह रहा है की स्टेशन के लिये जगह चाहिये । हमें अपने घर तुरंत ख़ाली करने है ।

इन्सान २ “वाह रे वाह, ऐसे कैसे ख़ाली करेंगे, कितने सालोंसे हम रह रहे है यहाँ ।

मैं हलकेसे “ फिर यहाँ से कहाँ जायेंगे?”

इन्सान ३ “उन्होंने सरकारी घर बाँधे है हमारे लिये अपने घरोंके साईज़ की।”

“हाँ पर वो सरकारी घर कहाँ और अपनी सोसायटी कहाँ” अपने आलीशान सोसायटी पे नज़र घुमाती इन्सान ४ बोली ।

इन्सान २ “वो फ़िश अंकल तो कह रहे रहे थे की पानी में रास्ते और नदी किनारे के रास्तोंसे उनकी इकोसिस्टिम ख़राब हो रही है। इसलिये वो रास्तेभी बिल्डिंग्ज तोड़कर ही होंगे ।”

इन्सान ३ “मगरमच्छजी भी वही बात कर रहे थे, नो रिव्हरफ्रंट “

इन्सान ४ “अैमेझॉन रानी कह रही थी की जंगल के पशुपक्षीयों को रहने के लिये घर नहीं। कुछ भी...”

इन्सान ५ “पोलर बेअर तो बता रहें थे की २०३० तक आर्क्टिक का सब आईस पिघल रहा है । इसलिये अपने बिल्डिंग्ज तोड़कर आर्टिफिशल आईस लँड बनायेंगे वहाँ।”

इन्सान ६ “ पर ये तो अन्याय है। वो हमें हमारे घरसे बाहर कैसे निकाल सकते है? ये सब ग़लत है...”

सब मानव एक साथ “हाँ ये सब ग़लत है...हाँ ये सब ग़लत है...हाँ ये सब ग़लत है...”

“हाँ ये सब ग़लत है... वाट द फ....” और तभी मेरी आँखें खुल गयी ।

साला ये तो ड्रीम था । कल पार्टी में थोड़ी जादा हो गयी । इस लिये ऐसे ड्रीम्स आ रहे है ...

आईफ़ोन में देखा। ७ बजे थे ।

“साला संडेको कोई ७ बजे उठता है क्या? क्या बचकाना ड्रीम था। नेचर गया...”

बोलते हुए थंडे थंडे एसी में मुलायम बिस्तरपर रज़ाई ओढ़कर मै आरामसे सो गया ।

‘लाईफ हो तो ऐसी’

वैधानिक इशारा : ये इक पूर्णत: काल्पनिक ड्रीम है। रिलॅक्स। अब आप आरामसे सो सकते है ।

प्रमोद वाघमारे

विशेष आभार संजय विघ्ने

https://pramodplanet.blogspot.com/
#pramodplanet #growforests

(C) Pramod Waghmare

Monday, October 7, 2019

जंगले उगवणं सोपं आहे का?


‘आपण जंगले का उगवू शकत नाही?’ कन्येचा प्रश्न

‘जंगले उगवणं सोपं आहे का?’ मी पेपर बाजूला ठेवत प्रतिप्रश्न केला.

‘ही नवी पिढी ना...’ मी मनातल्या मनात

‘का नाही उगवू शकत?’ आता मुलगा पण सामिल झाला

मी: ‘अरे २०१५ ते २०१७ पर्यंत फाॅरेस्ट आणि ग्रीन कव्हर १ टक्क्यापेक्षा वाढलंय भारतातलं’

कन्या: ‘पण त्यात एक हेक्टर जमिनीवर १० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे असली तरी जंगल पकडलंय. शिवाय कमर्शियल झाडी चहा मळे, बांबू, पाम झाडे यांना पण यात पकडलंय असं म्हणतात.’

मी: ‘अरे आपण वर्षानुवर्षे किती तरी वृक्षारोपण करत अाहोत. आपल्या सोसायटीत बघ किती झाडे आहेत.’

मुलगा: ‘पण त्यांना आपण जंगल म्हणू शकतो का? तिथे वाघ हरणं माकडे ही वन्य प्राणी राहू शकतात का?’

मी: ‘अरे जंगल उगवणं सोपं असतं का?’

कन्या: ‘का सोपं नाही? आपण अब्जावधी रूपयांचे प्रोजेक्टस पूर्ण करतो. भारतात शेकडो एकर जमीन पडून आहे, ती जमिन प्लॅन करून तेथे जंगले आपण तयार का करू शकत नाही?’

प्रश्न तर बरोबर होता पण त्यांना उत्तर न देता मी वर्षानुवर्षांच्या सवयीनुसार पेपरमध्ये डोकं घातलं...

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#planetpramod

(C) Pramod Waghmare

Thursday, October 3, 2019

निसर्ग गेला...

निसर्ग गेला...

रविवारची मस्त सकाळ. उशिरा उठलो. रात्री पार्टीत जरा उशीरच झाला.

‘यार लाईफ हो तो ऐसी’ असा विचार करत लुसलुशीत बेडच्या बाहेर पडलो आणि आपले कर्तव्य आठवले.
‘निदान दोन राउंड मारायला पाहिजेत’

तयार होऊन २१ व्या मजल्यावरून चकचकीत लिफ्टने खाली उतरून इटालियन मार्बलच्या आलीशान लॉबीमधून सोसायटीच्या गार्डनमध्ये प्रवेश करता करता ‘लाईफ हो तो ऐसी’ गुणगुणत होतो.

समोर गार्डनमध्ये मानवांची खुप गर्दी दिसत होती. काही नटून थटून आलेले होते तर काही बेडवरून डायरेक्ट खाली आलेले दिसत होते. काही मानव तर सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा येणारे, महिनोंमहिने न दिसणारे. सर्वजण तावातावाने काहीतरी बोलत होते. देशाचा ‘जबाबदार नागरीक’ असल्याने मी चौकशी करण्यासाठी त्या कळपात घुसलो.

मानव १ “अरे राजा झाला म्हणून काय झालं. शेरसिंग राजा म्हणतोय स्टेशनसाठी जागा पाहिजे. तुम्ही तुमची घरे तात्काळ खाली करा.”

मानव २ “ वा रे वा. अशी कशी खाली करायची? किती वर्षे राहतोय येथे आपण.”

मी हळूच “मग जायचे कोठे येथून?”

मानव ३ “त्यांनी सरकारी घरे बांधलीत आपल्या फ्लॅटच्याच मापाची. तिकडे जा म्हणतात.”

“अगं पण आपल्या सोसायटीची सर तिथे कुठे?” आपल्या झगमगीत सोसायटीकडे एकवार प्रेमाने नजर फिरवीत मानव ४ म्हणाली.

मानव २ “ते फिशअंकल तर म्हणाले म्हणे पाण्यातल्या रस्त्यांमुळे आणि नदीकाठच्या रस्त्यांमुळे त्यांची इको सिस्टीम खराब होतेय. म्हणून हे रस्तेपण बिल्डिंगा पाडून होणार.

मानव ३ “मगरसर पण तेच म्हणत होते, नो रिव्हरफ्रंट”

मानव ४ “ॲमेझाॅन राणी म्हणत होती की जंगलातल्या पशुपक्षांना घरे नाहीत. काहीही...”

मानव ५ “पोलर बिअर तर म्हणत होते की २०३० पर्यंत आर्टिक्टचा सर्व बर्फ वितळतोय त्यामुळे आपल्या बिल्डिंगा पाडून आर्टिफिशल आईस लॅंड बनवणार आहेत म्हणे.”

मानव ६ “पण हा अन्याय आहे, आपल्याला आपल्या घराबाहेर काढणार? हे पूर्ण चुकीचं आहे.”

सर्व मानव एका सुरात “हो हे सर्व चुकीचं आहे.... हो हे सर्व चुकीचं आहे.... हो हे सर्व चुकीचं आहे.... “

“हो हे सर्व चुकीचं आहे.... व्हाॅट द फ....“ बोलता बोलता माझे डोळे उघडले.

साला स्वप्न होतं तर? काल पार्टीत जास्त झाली होती, अशी स्वप्न पडतायत...

आयफोनमध्ये बघितलं. ७ वाजले होते.

“साला संडेला सातला कोण उठतं का? काय ते चाईल्डीश स्वप्न. निसर्ग गेला....”

म्हणत थंडगार एसीत लुसलुशीत बेडवर अंगावर मऊ रजई ओढत मी मस्त ताणून दिली...

‘लाईफ हो तो ऐसी’

वैधानिक इशारा : हे एक पूर्णपणे काल्पनिक स्वप्न आहे. रिलॅक्स. तुम्ही आता शांतपणे झोपू शकता.

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet

(C) Pramod Waghmare

ॲमेझाॅनचे वणवे : काही शिकवू पाहतंय

ॲमेझाॅनचे वणवे : काही शिकवू पाहतंय

ब्राझिलच्या अॅमेझाॅन जंगलांमधल्या वणव्यांनी आणि आगींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. १९ आॅगस्ट २०१९ साओ पाओलो हे ब्राझीलचं सर्वात मोठे शहर भरदिवसा अंधाराने व्यापलं आहे. वणव्यांच्या काळ्या धुरामुळे भर दुपारी अंधार झाला. हजारोंच्या संख्येने वणवे पसरले, आगीने रौद्र भयावह रुप धारण केलं. अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोमध्ये भरदिवसा अंधार झाला.

अॅमेझाॅन जंगल ५५ लाख चौरस किमी क्षेत्रात पसरलं आहे. जगात उपलब्ध ऑक्सिजनचा २० टक्के भाग ही जंगले निर्माण करतात आणि म्हणूनच या जंगलांना जगाची फुफ्फुसही म्हटलं जातं. १६ हजारांपेक्षा जास्त झाडं-झुडपांच्या प्रजाती, सुमारे ३९ हजार कोटी झाडं, २५ लाखांपेक्षा जास्त किटकांच्या विविध प्रजाती या जंगलांमध्ये सापडतात. अॅमेझॉनच्या जंगलात ४०० ते ५०० पेक्षा जास्त आदिवासी जाती राहतात.

या वणव्यांमुळे जीवहानी झालीच शिवाय अनेक प्रकारचे झाडे वनस्पती नष्ट झाल्या. पशु पक्षांना सुरक्षित हलवण्याची साधने आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रांची कमतरता पडली.

या वणव्यांच्या घटनेला आणखी एक पैलू नुकताच आढळून आला. माॅनीटरींग आॅफ द अॅंडियन ॲमॅझाॅन प्रोजेक्ट Monitoring of the Andean Amazon Project (MAAP) यांच्या रिपोर्टनुसार जवळपास १ लाख २५ हजार हेक्टर म्हणजे ३ लाख १० हजार एकर दाट जंगल २०१९ सालच्या सुरूवातीला तोडण्यात आले. या भागात आॅगस्ट महिन्यामध्ये आग लावण्यात आली आणि या जमिनी शेतीसाठी तयार करण्यात आल्या.

काही मोठे शेतकरी आणि मोठे कुरणे असलेले यांनी पद्धतशीरपणे पहिले जंगलतोड करून उन्हाळ्यात ही झाडे सुकल्यावर त्यांना आग लावली आणि या राखेचा खत म्हणून वापर केलेला आढळला. या मोकळ्या जमिनींवर गुरांना चरण्यासाठी कुरणे गायराने तयार करण्यात आल्याचेही लक्षात आले. नासा आणि इतर संस्थांच्या सॅटेलाईट फोटो आणि व्हिडीओ टाईम लॅप्स पद्धतीने अभ्यासल्यावर जंगलतोड आणि पाठोपाठ वणवे लावून जमिनी मोकळ्या केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.

मानवी संवेदनहीनतेचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल. मानव कधी शेती, कधी घरांसाठी, कधी विकासासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी निसर्गावर आक्रमण करत आलाय. याचे दुष्परिणाम आता त्या त्या विभागांपर्यंत त्या त्या देशांपर्यंत मयार्दित राहिले नसून याला आता वैश्विक रूप येत आहे.

मानवाला या निसर्गाचा आदर करणे शिकले पाहिजे. ॲमेझाॅन वणवे आपल्याला काही शिकवू पहात आहेत !!!

प्रमोद वाघमारे
https://pramodplanet.blogspot.com/

 #PrayforAmazonas #pramodplanet

(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...