Tuesday, January 21, 2025

इमानदारी मराठी

 इमानदारी


अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी धुमाळ नेहमी बोलतो,” ए बागवान, तू पीत पण नाही आणि खात पण नाही. मग पोलीस खात्यात कशाला आलास रे?”

वीस वर्ष इमानदारीने पोलीस खात्यात नोकरी केली. कधी एक पैसाही खाल्ला नाही. आता याचे तोटे असणारच ना. मागच्या महिन्यात माझ्या मुलीला, परीला मोठ्या कॉलेजात ऍडमिशन घ्यायची होती. पण नाही घेऊ शकलो. डोनेशनला द्यायला पैसे नव्हते ना माझ्याकडे. माझी बायको केतकी माझ्यावर भयंकर चिडली,” अहो सगळं जग बदललं. पण तुम्ही… कधीच बदलणार नाही.” रागाने परीला घेऊन तिच्या भावाकडे गेली, कायमची…पण माझ्या याच इमानदारीवर भाळून केतकीने माझ्याशी लग्न केले होते ना? आपल्या घरच्या सर्वांचा विरोध असतानाही… मला खात्री आहे केतकी आणि परी माझ्याकडे परत येतील.


तर आजचा दिवस माझ्या सहनशक्तीचा अंत पाहणार होता. एका गुंडाला पकडलं. पोरीची छेड काढत होता. तर मंत्र्याचा फोन आला,” सोड त्याला.” मी म्हटलं,”नाही सोडणार” पाच मिनिटात एसीपी धुमाळ चा फोन,”एऽऽ बागवान… लय मस्ती आली व्हय? तुझी ट्रॅफिकला बदली झालीय. जा उद्या तिकडं.” माझं डोकंच सणकलं. माझ्या इमानदारीचं हे बक्षीस?

सरळ गाडी काढली आणि घरी निघालो. संध्याकाळच ट्रॅफिक होतं. गाडी हळू चालली होती आणि मला तो दिसला… एका छोट्या लॉज मध्ये लपतछपत आत घुसत होता. पारेख… कानपूरला मालकाला टोपी लावून त्याचं दहा कोटीचा सोनं घेऊन फरार झाला होता. महिनाभर सगळे शोधत होते त्याला. मी सरळ लॉज मध्ये त्याच्या रूममध्ये घुसलो और दो झापड लगाये. तसा पारेख पोपटासारखा बोलू लागला. त्याची गचांडी धरली. लॉज मध्ये सीसीटीव्ही नव्हता. कोण बघत नाही हे बघत मी त्याला कार मध्ये घातला. त्याची बॅग पाठीमागे टाकली आणि निघालो.


काय डोक्यात आलं… मी गाडी पोलीस स्टेशनला न घेता सरळ वाईच्या जंगलात इथं या खोलीवर आणली. खोलीवर येताच पारेख जाम घाबरला,” साब मांडवली करो ना. हे दहा कोटीचं सोनं आहे. अर्ध तुम्ही ठेवा. तुम्हाला नोकरीत एवढं मिळणार नाही. साब विचार करा थोडा.”


मी विचार करू लागलो. या नोकरीने, या इमानदारीने मला काय दिलं?  कष्ट मी करायचो, मेडल दुसराच कोणी घेऊन जायचा. माझी बायको मुलगी मला सोडून गेली आणि आज ट्रॅफिक मध्ये बदली. म्हणजे माझी उरलीसुरली इज्जत पण गेली. डोकं घणघणायला लागलं. संताप आला होता. मी झटक्यात पारेखच्या खुर्चीच्या मागे गेलो आणि त्याला समजायच्या आतच त्याची मान.., 

पारेखची बॉडी जमिनीवर पडली. नाही, त्याची बॉडी नाही. माझी इमानदारीच तिथे मरून पडली होती…

चलो… इथून अर्ध्या तासावर दाट जंगलात एक दरी आहे. तिथे पारेखची बॉडी टाकतो. कोणालाच मिळणार नाही ती.  उद्या ट्रॅफिकला जॉईन होतो… दहा दिवस काम करतो आणि मग राजीनामा…नंतर?

गुड बाय


लेखकः प्रमोद वाघमारे 

Copyright ©️ Pramod Waghmare

Tuesday, September 17, 2024

करप्ट ऑफिसर (हिंदी)


करप्ट ऑफिसर

बन्सलसाब, ये काम अभी के अभी बंद कर दो । आप कोई नए बिल्डर नहीं हो । ये फ़ॉरेस्ट, ग्रीन ज़ोन हैं । यहाँ एक एकड़ ज़मीन पर एक हज़ार स्क्वेअर फ़ीट बाँध सकते हैं । और यहाँ आपने तो बंगले ही बंगले बांध दिए हैं । दस गुना ज़्यादा कन्स्ट्रक्शन… और ये अभी मुंबई के रईस लोग ख़रीदेंगे । क्या कहते उसको… फार्म हाउस हॅालिडे होम… एक एक बंगला…पाँच पाँच करोड़…

आप लोगों ने यह जंगल तबाह कर दिया हैं । अब किस को फ़ोन कर रहे हो ? एमएलए? या मंन्त्री? करो… वो भी दो चार करोड़ खाएगा । पर मैंने स्टे ऑर्डर दिया… तो पाँच साल कुछ काम कर नहीं सकेंगे आप… 

ज़रा सोच लीजिए… मैं फिरसे समझाता हूँ । आप ये इल्लिगल काम से करोड़ों कमाएँगे । कसं असतं… सगळं एकट्यानी खायचं नसतं । सब मिल जुल के खाएंगे । आपको इतना पैसा मिल रहा है, उसमे से थोऽऽऽसा हमे भी दिजिए… बस… बराबर ना?



Wednesday, February 14, 2024

मैं और तुम… तुम और मैं

Mein aur Tum… Tum aur mein


मैं और तुम… तुम और मैं 


(Ek car aati hai aur raste ke side pe band pad jati hai)

Woman: Arre ye band pad gayi

Man: Oh. Isse abhi band padna tha?

(Bahar nikalkar car ka bonnet kholta hai. Woman bahar aakar uske baju mein khadi ho jati hai)

Woman: Tumhe kab se kah rahi thi, gadi servicing karni padegi.

Man: Itne kaam pade hai. Kab gadi servicing karu? Iss week karne wala tha.

Woman: Aise bahot weeks chale gaye.

Woman: Mera aur ek birthday celebration Gaya. 

Man: Abhi bas bhi kar. 

Woman: Ek to kaam se tumhe mere liye time nahi milta…

Man: Wait. Main service person ko phone karta hoon. 

(Mobile lekar side ho jata hai. Tabhi ek bike pe young couple bike park karte hai)

Young M: Ab bike pe gussa mat kar. Abhi ruke hai. Ab bol. kya bolna hai. 

(Dono utar ke footpath pe khade hote hai)

Young W: Tumhe aaj bhi time nahi mila. Main theatre pe wait kar rahi thi.

Young M: US client ka call aya tha. Kya karta?

YW: Mobile band rakhte naa.

YM: Nahi rakh sakte. Job hai meri.

YW: Shadi ke pehle yahi job thi. Tab kaise mere aage pichhe ghumte the.

YM: Firse shuru? 

YW: Ghar pe bhi ek kaam nahi karte.

YM: Job karta hoon. Thak jata hoon yaar.

YW: Main nahi job karti? Main nahi thakti? Naukari karo, ghar ke kaam karo.

YM: Fir chhod de job… Ghar pe baith…

(YW confused, freezes…)

Woman: Wo kyu chhode job?

YM: Fir? Kya hua job chhoda to?

Woman: Usse bhi kamana hai. Tere ek ke salary pe ghar chalega?

(Phone bandh karke Man aa gaya hai) 

Man: Kyu nahi chalega? Ye jyada kaam karega?

YW: Issi job main time nahi mil raha…

YM: Main dekh lunga…

Woman: Kaise dekhoge? 

YM: Uski salary mujhse jyada hai. But I’ll manage.

Man: Haan… Sach to ye hai ki ye jyada kamaa rahi hai; isliye tumhara ego hurt ho raha hai. 

Woman: Iss main ego kaha se aaya…

(YW again freezes…)

Man: Tum jal rahe ho uspe. Kyu ki woh jyada kama rahi hai. 

Woman: Woh kyu jalega. Usse pyaar karta hai wo. 

YW: Nahi pyaar karta. Isliye aaj movie ka program cancel kiya. 

Woman: Are kaam hote hai, responsibility hoti hai…

Man: Kaam to kaam hota hai. Apne wife ke liye bhi time nikalna chahiye naa…

YW and Woman (together): Wohi to hum keh rahe hai…

(YM aur Man ek dusre ko dekhte hai. Fir YW Woman ko dekhte hai. Aur kya hua ye samjhkar charo jor jor se hanse lagte hai)


(C) Pramod Waghmare

Wednesday, January 3, 2024

चॅाकलेट मराठी

 सीन १ 

एक व्यक्ती दरवाजातून,” काका, कसे आहात?”

काका,” अरे अवनीश.” मोठ्याने हसत मिठी मारत. “कधी आलास अमेरिकेतून?”

अवनीश,” काल रात्री आलो.”

काका,” अरे किती वर्षांनी आलास.”

अवनीश, “चार वर्षांनी आलोय. दहा दिवसात परत जातोय.”

काका,” बरं झालं आलास. बायकोला आणलेस की नाही.”

अवनीश,” हो किर्ती आलाय ना… घरीच थांबलीय आई जवळ.” 

काका,”बोलव की तिला. चार मजले तर वर यायचंय.”

अवनीश,”हो बोलावतो की.”

फोन लावतो. पलीकडून फोन उचलला जात नाही.

अवनीश,” काका, हे बघा. तुम्हाला अमेरिकेतून चॅाकलेटस् आणलेत.”


काका चॅाकलेट्स कडे बघतो. पहिल्यांदा घाबरलेले भाव. डोळे अस्वस्थपणे इकडे तिकडे बघतोय. श्वास मोठे होत आहेत. चेहऱ्यावर घाम. चेहरा पूर्ण घाबरलेला.


अवनीश चॅाकलेट्सचा बॅाक्स काकांच्या तोंडासमोर घेतो,” घ्या ना काका.” 

काका पूर्ण घाबरून,” नको… नको… नको मला..”

अवनीश,” घ्या ना काका…”

काकांच्या चेहऱ्यावर वेडसर भाव. काका,” नको म्हटलं ना…”

अवनीश बॅाक्स चेहऱ्याजवळ नेत,” घ्या ना काका ऽऽऽ”

काका मोठ्याने रागाने चिडत मोठ्याने ओरडत,” नको म्हटलं नाऽऽऽ”

स्क्रीनवर काकांचा चिडलेला चेहरा. 

अंधार


सीन २

दरवाजाची बेल वाजते.

एक स्त्री,” काका, अवनीश आलाय का?”

काका,” तू किर्ती ना?”

किर्ती,” हो काका. अवनीश आला का?”

काका,” अगं आत तर ये. बस.” 

किर्ती बसत,”एक तास फोन करतेय. फोन उचलते नाही तो.”

काका,” अगं तो अर्धा तासापुर्वीच गेला. त्याचा कोणता मित्र आला खाली आला होता.”

किर्ती उठत,”ओके. मग काय लवकर येतोय तो. मी जाते.”

वळते पण तिचं लक्ष शेजारी ठेवलेल्या चॅाकलेट बॅाक्सकडे जाते. 

“अरे काका. तुम्ही चॅाकलेटस् खाल्लेत नाहीत. घ्या ना.”

काकांसमोर बॅाक्स नेते. काकांचा चेहरा वेडसर संतापलेला.

तिचं लक्ष काकांच्या मागे टेबलामागे जाते. अवनीशचा मृतदेह तिला दिसतो. ती मोठ्याने किंचाळते.

काका तिचा गळा दाबतोय. दरवाजा तोडून शेजारी आत येतात.


सीन ३ 

पोलिस काकांना पकडून बाहेर नेत आहेत.

शेजारीः काकांच्या बायकोला तिच्याच पुतण्याने चॅकलेटमध्ये विष टाकून मारून टाकले. तेव्हापासून चॅाकलेट्स बघून काका बिथरायचे. पण खुन म्हणजे खुपच झालं…” 


(R) Pramod Waghmare

Friday, June 2, 2023

डिलिवरी गर्ल (मराठी)

 शेजारीण काकू शिल्पाः काय हो आजोबातुमची सून डिलिवरी गर्लचे काम करते म्हणे?

आजोबाः हॅशक्यच नाहीश्रेयस ? मेघना ? जरा बाहेर या बरं.

(श्रेयस मेघना बाहेर येतात)

श्रेयसः काय झालं बाबा?

शिल्पाः विचारा आता. (मेघनाकडे बघत तोंड वेडावत चिडवतडिलिवरी गर्लहं

(श्रेयस शिल्पाकडे बघून दुर्लक्ष करून प्रमोदकडे बघतप्रमोदः काय रे श्रेयसतुझी बायको डिलिवरी गर्लचे काम करतेखरं आहे का

मेघनाः होमी डिलिवरी गर्लचे काम करते.

शिल्पाः बघाऽऽऽऽ (हात गोलाकार फिरवत चिडवत)

श्रेयसः ओऽ काकूकाय चाललंय?

सिद्धीः आईडिली… डिली… म्हणजे काय गं?

देवांशः मला पण सांग ना.

प्रमोदः हे जेवण सामान घराघरात पोचवतात ना ते.

शिल्पाः बायांनी असं घरोघरी फिरायचंलोकं थुंकतील तुमच्यावर

प्रमोदः श्रेयसअरे आपली इज्जत काय राहणार?

श्रेयसः कसली इज्जतगल्लीबाहेर आपल्याला कोण तरी ओळखते का?

मेघनाः मला मुलांना खुप शिकवायचंयह्यांचा पगार पुरतो का आपल्याला?

श्रेयसः आणि काकूतुम्ही कोण सांगणाऱ्यामाझी बायको काय पण काम करेलसरळ चालू लागा

(देवांश सिद्धी दोघे श्रेयस मेघनाला बिलगतातशिल्पा नाक मुरडते आणि रागाने पाय आपटत बाहेर जाते)


#pramodwaghmare #actingpramod

(C) Pramod Waghmare 


मी कुठे हरवून गेले?

 लेखक प्रमोद वाघमारे


हॅालमध्ये पाच जणी उभ्या आहेतगौरीदिव्यामेघनास्वातीशिल्पा या क्रमानेमी आरामात खुर्चीत बसलोय.

(दोन पावलं पुढे येतगौरीः बाबामी खेळायला जाऊ?

मीः नकोजा कपडे आवर

गौरीः पण दादा तर खेळतोय ना… (गौरी नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतदिव्याः बाबामी स्कुल ट्रीपला महाबळेश्वरला जाऊ का?

मीः नकोतिथे थंडी असते.

दिव्याः पण दादा तर जातोय ट्रीपला… (दिव्या नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतमेघनाः मी मुंबईला पुढचं शिक्षण घेऊ?

मीः कशालातुझं लग्न ठरवतोय आम्ही.

मेघनाः पण मला खुप शिकायचंय… ( मेघना नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतस्वातीः अहोमी नोकरी करू का?

मीः नकोमग घर कोण सांभाळणार?

स्वातीः पण मला पण मोठं व्हायचंय… (स्वाती नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतशिल्पाः अहोआपण कुठे महिनाभर फिरून येऊ का?

मीः नकोमग नातवंडांना कोण सांभाळणार?

(प्रेक्षकांकडे बघतशिल्पाः बहिणमुलगीपत्नीआईआजीची कर्तव्ये पार पाडता पाडतामी कुठे हरवून गेलेकाय माहित

(निराशेचे जमिनीकडे बघते)


#pramodwaghmare #actingbypramod 

(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...