Friday, June 2, 2023

डिलिवरी गर्ल (मराठी)

 शेजारीण काकू शिल्पाः काय हो आजोबातुमची सून डिलिवरी गर्लचे काम करते म्हणे?

आजोबाः हॅशक्यच नाहीश्रेयस ? मेघना ? जरा बाहेर या बरं.

(श्रेयस मेघना बाहेर येतात)

श्रेयसः काय झालं बाबा?

शिल्पाः विचारा आता. (मेघनाकडे बघत तोंड वेडावत चिडवतडिलिवरी गर्लहं

(श्रेयस शिल्पाकडे बघून दुर्लक्ष करून प्रमोदकडे बघतप्रमोदः काय रे श्रेयसतुझी बायको डिलिवरी गर्लचे काम करतेखरं आहे का

मेघनाः होमी डिलिवरी गर्लचे काम करते.

शिल्पाः बघाऽऽऽऽ (हात गोलाकार फिरवत चिडवत)

श्रेयसः ओऽ काकूकाय चाललंय?

सिद्धीः आईडिली… डिली… म्हणजे काय गं?

देवांशः मला पण सांग ना.

प्रमोदः हे जेवण सामान घराघरात पोचवतात ना ते.

शिल्पाः बायांनी असं घरोघरी फिरायचंलोकं थुंकतील तुमच्यावर

प्रमोदः श्रेयसअरे आपली इज्जत काय राहणार?

श्रेयसः कसली इज्जतगल्लीबाहेर आपल्याला कोण तरी ओळखते का?

मेघनाः मला मुलांना खुप शिकवायचंयह्यांचा पगार पुरतो का आपल्याला?

श्रेयसः आणि काकूतुम्ही कोण सांगणाऱ्यामाझी बायको काय पण काम करेलसरळ चालू लागा

(देवांश सिद्धी दोघे श्रेयस मेघनाला बिलगतातशिल्पा नाक मुरडते आणि रागाने पाय आपटत बाहेर जाते)


#pramodwaghmare #actingpramod

(C) Pramod Waghmare 


मी कुठे हरवून गेले?

 लेखक प्रमोद वाघमारे


हॅालमध्ये पाच जणी उभ्या आहेतगौरीदिव्यामेघनास्वातीशिल्पा या क्रमानेमी आरामात खुर्चीत बसलोय.

(दोन पावलं पुढे येतगौरीः बाबामी खेळायला जाऊ?

मीः नकोजा कपडे आवर

गौरीः पण दादा तर खेळतोय ना… (गौरी नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतदिव्याः बाबामी स्कुल ट्रीपला महाबळेश्वरला जाऊ का?

मीः नकोतिथे थंडी असते.

दिव्याः पण दादा तर जातोय ट्रीपला… (दिव्या नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतमेघनाः मी मुंबईला पुढचं शिक्षण घेऊ?

मीः कशालातुझं लग्न ठरवतोय आम्ही.

मेघनाः पण मला खुप शिकायचंय… ( मेघना नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतस्वातीः अहोमी नोकरी करू का?

मीः नकोमग घर कोण सांभाळणार?

स्वातीः पण मला पण मोठं व्हायचंय… (स्वाती नाराज होत दोन पावलं मागे हटते)


(दोन पावलं पुढे येतशिल्पाः अहोआपण कुठे महिनाभर फिरून येऊ का?

मीः नकोमग नातवंडांना कोण सांभाळणार?

(प्रेक्षकांकडे बघतशिल्पाः बहिणमुलगीपत्नीआईआजीची कर्तव्ये पार पाडता पाडतामी कुठे हरवून गेलेकाय माहित

(निराशेचे जमिनीकडे बघते)


#pramodwaghmare #actingbypramod 

(C) Pramod Waghmare

कॅान्फरन्स (मराठी)

 (केबिन मध्ये येत

तीः सर सर्व स्टाफ गेलामी जाऊ?

बॉसः ओहठीक आहेतू जा.

ती वळून परत फिरताच

बॅासः ऐक ना.. (ती बॅासकडे फिरून बघतेनेक्स्ट वीक आपली दिल्लीला आपली कॅान्फरन्स आहे.

तीः कधी?

बॅासः फ्राय डे टू संडेआपण दोघे जाऊन येऊ.

तीः सर मला नाही जमणार

बॅासः का?

तीः मी कधी बाहेरगावी गेली नाही आणि तुमच्या बरोबर..

बॅासः वॅाटकाय बोलतेय तू?

तीः आय डोन्ट फील कंफर्टेबल… सॅारी सर

बॅासः कम्मॅान.. कुठल्या जगात वावरतेस तूइटस् नॅार्मल

तीः नाही सरप्लीज

बॅासः ओके मी एम्प्लॅाईज लीस्ट सांगितली होतीकेलीय?

तीः हो पाठवते मेल

बॅासः प्रमोशन्स द्यायचेततू पण डिजर्विंग होतीस

तीः म्हणजे कायआर यू सजेस्टिंग मी समथिंग?

बॅासः काय?

तीः प्रमोशन्स आणि कॅान्फरन्स ट्रीपयांचा काय संबंध आहे का?

बॅासः नॅाट ॲट ॲालतू लहान नाहीसगुड नाईटमेल कर मला.


#pramodwaghmare #actingbypramod

(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...