Monday, October 7, 2019

जंगले उगवणं सोपं आहे का?


‘आपण जंगले का उगवू शकत नाही?’ कन्येचा प्रश्न

‘जंगले उगवणं सोपं आहे का?’ मी पेपर बाजूला ठेवत प्रतिप्रश्न केला.

‘ही नवी पिढी ना...’ मी मनातल्या मनात

‘का नाही उगवू शकत?’ आता मुलगा पण सामिल झाला

मी: ‘अरे २०१५ ते २०१७ पर्यंत फाॅरेस्ट आणि ग्रीन कव्हर १ टक्क्यापेक्षा वाढलंय भारतातलं’

कन्या: ‘पण त्यात एक हेक्टर जमिनीवर १० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे असली तरी जंगल पकडलंय. शिवाय कमर्शियल झाडी चहा मळे, बांबू, पाम झाडे यांना पण यात पकडलंय असं म्हणतात.’

मी: ‘अरे आपण वर्षानुवर्षे किती तरी वृक्षारोपण करत अाहोत. आपल्या सोसायटीत बघ किती झाडे आहेत.’

मुलगा: ‘पण त्यांना आपण जंगल म्हणू शकतो का? तिथे वाघ हरणं माकडे ही वन्य प्राणी राहू शकतात का?’

मी: ‘अरे जंगल उगवणं सोपं असतं का?’

कन्या: ‘का सोपं नाही? आपण अब्जावधी रूपयांचे प्रोजेक्टस पूर्ण करतो. भारतात शेकडो एकर जमीन पडून आहे, ती जमिन प्लॅन करून तेथे जंगले आपण तयार का करू शकत नाही?’

प्रश्न तर बरोबर होता पण त्यांना उत्तर न देता मी वर्षानुवर्षांच्या सवयीनुसार पेपरमध्ये डोकं घातलं...

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#planetpramod

(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...