Wednesday, October 9, 2019

जंगल वाढवा #growforests

जंगल वाढवा  #growforests

तीन चांगल्या बातम्या

1. आयर्लंड प्रत्येक वर्षी २ कोटी २० लाख झाडे लावणार आहे. २०४० पर्यंत एकुण ४४ कोटी झाडे लावून पर्यावरण बदलाचा (climate change) सामना करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

2. चीनने आपले ६० हजार सैनिक झाडे लावण्यासाठी पाठवण्याचे ठरविले आहे. बिजींग जवळील हबे Hebei province येथे हे वृक्षारोपण चालू करण्यात येणार आहे. जंगलांची वाढ करून हवेचे प्रदूषण कमी करण्याचा उद्देश आहे. धूर आणि धुके smog बीजिंग शहर त्रस्त आहे.

3. सदगुरू आणि इशा फाऊंडेशन यांनी कावेरी काॅलिंग Cauvery Calling हे अभियान चालू केले आहे. ज्यात शेतकर्यांच्या मदतीने २४२ कोटी झाडे कावेरी नदीच्या परिसरात Cauvery basin अॅग्रोफाॅरेस्ट्री अंतर्गत लावण्याचे ठरविले आहे. जमिनीची पोत सुधारणे, जमिनीतली जलपातळी Ground water level वाढविणे आणि शेतकर्यांचे उत्पन्न पुढील ५ ते ७ वर्षात ३०० ते ८०० टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

भारतात खाजगी कंपन्यांच्या मदतीने जंगल वन क्षेत्र वाढवू शकतो. आपण शेकडो एकर जमिन खाजगी कंपन्या/ शैक्षणिक संस्था/ सहकारी संस्था/ एनजीओंना खुप कमी किमतीत देतो. आपण जमिन देतानाच जर कलम टाकले ज्यानुसार दिलेल्या जमिनीपैकी १० टक्के जमिन त्यांनी दाट वनामध्ये Very Dense Forest (७५% पेक्षा जमिनींवर झाडे) रूपांतरित करावी आणि ते वन जंगल राखण्याची जबाबदारी त्या कंपनी/ट्रस्ट/एनजीओंना द्यावी. नक्की याचा फायदा होऊ शकतो !!!

Pramod Waghmare

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...