एक लोककथा आहे
एकदा एका राजाने आपल्या नव्या सरदाराची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्याने एका वाडग्यात तेल भरले आणि सरदाराला राजवाड्या भोवतालच्या बागेत पूर्ण फिरून यायला सांगितलं.
सरदार त्या बागेत फिरून परत आला.
राजा ने बघितले की वाडग्यातले तेल जसेच्या तसे होते.
राजाने सरदाराला विचारले, “ आता मला सांग, बागेत तू काय काय बघितलेस ?”
सरदार बोलला,” माझे पुर्ण लक्ष तेलावर होते, त्यामुळे मी बागेत काहीच बघितले नाही.”
राजा, “ठीक आहे. तू पुन्हा एकदा बागेत फिरून ये.”
थोड्या वेळात सरदार परत आला. या वेळी त्याने राजाला बागेत बघितलेल्या प्रत्येक सुंदर गोष्टींचं विस्ताराने वर्णन केलं.
राजा बोलला, “ते बरोबर आहे, पण वाडग्यातले तेल कोठे आहे?”
सरदाराचे बघितले. बाग बघतां बघतां तेल रस्त्यात सांडले होते.
राजा बोलला, “बाग बघणे आवश्यक होतंच पण तेल पण सांडवायचं नव्हतं.”
आयुष्यात काम करता करता आनंदाचे छोटे छोटे क्षण आपण जाणते अजाणतेपणे दुर्लक्षित करतो. या दोन्ही गोष्टी आपले आयुष्य घडवत असतात.
त्याचप्रमाणे प्रगतिच्या या शर्यतीत आपण सर्व आपल्या या सुंदर पृथ्वीचा विनाश तर करत नाही ना हे पण बघणे खुप आवश्यक आहे!!!
प्रमोद वाघमारे
#pramodplanet #growforests