आज पुन्हा लेट झालो. कंपनी कॅंपसमध्ये पार्किंगकडे जात होतो. एका काॅर्नरला माझ्या कंपनीचे काही लोक कोरोना व्हायरसमदतीसाठी काही काम करत होते. मी त्यांना भेटलो आणि थोडी मदत केली.
माझ्या बाईकजवळ मी गेलो. तिथे एक माणुस उभा होता. मला बघून मला बोलला,” वा खुप छान. तू नेहमी लोकांना मदत करतोस.”
मी बोललो,” थोडी फार करत राहतो.”
“वा मुला. मी तुझ्यावर खुप खुश आहे. बोल तुला मी काय वरदान देऊ?” ती व्यक्ति बोलली.
चांगला टी शर्ट जीन्स घातलेल्या त्या व्यक्तीकडे मी पुन्हा बघितले, “मला थट्टामस्करी करण्याचा कोणताही मूड नाही.” बोलून मीबाईकला चावी लावली.
“मी मस्करी करत नाही. मी ईश्वर आहे.” म्हणून तो मला माझ्याबद्दलची एक एक गोष्ट सांगू लागला. त्याला माझ्या आयुष्यातल्या त्यागोष्टी सुद्धा माहित होत्या ज्या फक्त मलाच माहिती होत्या. तो पुन्हा बोलला,” सांग मुला.”
मी आता पूर्णपणे कन्फ्यूज झालो होतो. हा खरोखरच देव आहे? की नाही? नसणार. पण खरंच असेल तर?
मला स्वत:ला सांभाळून घेत मी बोललो,” मी एक मामूली माणुस आहे. आत्ता काही विचार करू शकत नाही. मी हे वरदान उद्या मागू? “
माझ्या बोलण्यावर ते थोडे हसले आणि बोलले,” ठीक आहे. उद्या याच वेळी इथेच भेटू.”
मी घरी पोहोचलो आणि पत्नीला सर्व सांगितले. ती बोलली,” माहित नाही ते ईश्वर आहेत की नाही. पण मागायला काय हरकत आहे? तुम्ही त्यांना तुमच्या प्रमोशनचं वरदान मागा. किंवा मुलांच्या शिक्षणासाठी वरदान मागा.”
मी बोललो,”पण चांगलं आरोग्य पण आवश्यक आहे. आणि आनंदपण आवश्यक आहे.”
पुढचे काही तास जीवनासाठी काय आवश्यक आहे आणि काय वरदान मागायचे हा विचार करता करता मी अजूनच जास्त संभ्रमितझालो.
दुसऱ्या दिवशी ॲाफिसमध्ये तोच विचार करत होतो. आपण सामान्य लोकांना काय काय हवं असतं. फक्त एका वरदानानी कायहोणार?
मी दहा मिनीट आधी त्याच जागी जाऊन थांबलो. तो व्यक्ति तेथे नव्हता. मी विचार करू लागलो. हे खरोखरच घडतंय का? ते खरोखरचईश्वर असतील? मी थांबू की निघून जाऊ?
“मग काय विचार केलास मुला?” आवाज ऐकून मी मागे वळून बघितलं,” सांग काय वरदान देऊ?”
मी घामाने पूर्ण ओला झालो होतो. काय मागू? हे मागू की ते?
“बोल मुला.” त्यांनी पुन्हा विचारले. ते ऐकून मी माझे हात जोडले.
आणि फक्त एवढंच बोलू शकलो,” हे ईश्वरा, मी तुमच्याकडे काय मागू? फक्त तुम्ही नेहमी मला तुमचे प्रेम देत रहा.”
मंदपणे हसत ईश्वर बोलले,” जशी तुझी इच्छा.”
मी त्यांच्या समोर मान झुकवली. जेव्हा मी वर बघितलं तेव्हा ते माझ्या समोर नव्हते.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/