“गुड मॉर्निंग सर.” मी बोललो.
“गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी भेटायला आलास? सर्व ठीक आहे ना? “
“सर, तुमची एक ॲडवाईस घ्यायची होती.” माझ्या समोर बसलेले सर एक यशस्वी बिझनेसमॅन होते. त्यांनी नेहमी माझी मदत केलीहोती आणि आज पण मला मदत करतील असा विश्वास होता.
“सांग मला.”
“सर, एका कंपनीने पार्टस् सप्लाय करण्यासाठी मला बोलावले आहे.”
“गुड.” सर.
“सर, पण दुसरा एक माणुसपण त्यांना भेटला जो कमी रेटमध्ये पार्टस् सप्लाय करायला तयार आहे.” मी बोललो.
“मग काम त्याला मिळेल.” सर बोलले.
“पण सर माझी क्वालिटी चांगली आहे. आणि मला माहिती आहे दुसऱ्या माणसाची क्वालिटी खूप खराब आहे. त्याने नेहमी फसवलेआहे.” मी बोललो.
“बघ मुला, तो काय करतोय ती त्याची पद्धत आहे. तू तुझ्या क्वालिटी, मेहनत आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. तुला सफलतामिळेलच.” सर बोलले.
“धन्यवाद सर.” मी बोललो.
सर बोलले,” आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा मांजर चोरून दूध पिते तेव्हा तिचे डोळे बंद असतात. तिला वाटतं की तिला कोणीबघत नाही. पण सर्वांना सर्व माहित असतं.”
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
Please like and follow
https://www.facebook.com/pramodplanet/