Wednesday, March 18, 2020

संगीत (मराठी)

एक दिवस माझे सुप्रीम कोर्टातील सिनीअर ॲडव्होकेट मित्रांच्या ॲाफिसमध्ये बसलो होतोतेव्हा त्यांची एक क्लायंट आपल्या मुलीलाघेऊन तिथे आली होती.

सरही माझी मुलगीया वर्षी वकील बनेल.” क्लायंटने सांगितले.

वाखुप छान.” माझे मित्र बोलले.

थैंक्यू सर.” मुलगी विनम्रतेने बोलली.

शिक्षणाबरोबर अजून काय करतेस?” मित्राने विचारले.

सरमी गेली पाच वर्ष शास्त्रीय संगीत शिकतेय.”

त्यावर माझे वकील मित्र बोलले,” क्या बात हैबेटावकिलीचं काम तुला जीवन जगण्याची साधनं देईलआणि संगीत तुला हे जीवनका जगायचं हे शिकवेल.”


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 


#pramodplanet #pramodwaghmare 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...