किती शानदार पार्टी होती. सर्व माझ्या शेजाऱ्याचे त्याच्या प्रमोशनसाठी अभिनंदन करत होते. मी त्यांना किती वेळ बघत होतो. कितीकाॅन्फिडन्स होता त्यांच्यात. सर्वांशी हसत गप्पा मारत होते ते.
“वाह क्या बात हैं. आपल्या एवढा काॅन्फिडन्स मी खुप कमी लोकांमध्ये बघितलाय.” पार्टी संपता संपता शेजाऱ्यांना थोडं रिलॅक्सझालेलं बघून मी बोललो. त्यांनी विनम्रतेने हात जोडले.
मी पुढे बोलू लागलो,” असं वाटतं जसं तुम्ही कधीच हारू शकत नाही. कुठून आणलात तुम्ही एवढा आत्मविश्वास?”
“तुम्हाला माहित नाही पण मी अभ्यासात खुपच कच्चा होतो.” शेजारी मला सांगू लागले,” शिक्षणानंतर नातेवाईकांच्या ओळखीने एकनोकरी मिळाली. पण तिथेही अडचणींचा सामना करावा लागत होता. मी चुका करत होतो आणि सर्वजण माझ्यावर रागावत होते आणिमी जास्तच चुका करत होतो.”
“अरेरे.” मी बोललो.
“ माझा आत्मविश्वास जसा संपूनच गेला होता. त्याच वेळी माझ्या ब्रॅंचमध्ये एक नवीन ॲाफिसर आले. एक दिवस त्यांनी माझा एकरिपोर्ट बघितला आणि त्यांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावले. मी तर खुप घाबरलो होतो.”
“ मग? “ मी विचारलं.
“त्यांनी माझा रिपोर्ट पुढे ठेऊन काही पाॅईंटस् वाचून माझं खुप कौतुक केलं. मी पहिल्यांदाच माझं कौतुक ऐकत होतो. मी एवढा खुशझालो होतो त्या दिवशी. मी पुढचा रिपोर्ट जास्त मेहनतीने बनवला. त्यांनी माझं अजूनच कौतुक केलं. त्यांचे कौतुक ऐकण्यासाठी मीअजूनच जास्त मेहनत करू लागलो.”
“वाह, सही ...” मी बोललो.
“ तीन वर्षांनंतर त्यांची ट्रांसफर झाली आणि त्याच दिवशी मला एम्प्लाॅई ॲाफ द इअर पुरस्कार मिळाला.
मी त्यांना भेटायला गेलो.
माझ्या खांद्यावर हात ठेवत ते बोलले,” हा काॅन्फिडन्स हा आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस.”
आणि खरंच त्या दिवसानंतर माझा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही.” शेजारी हे सांगत होते तेव्हा त्यांचे डोळे आत्मविश्वासानेचमकत होते.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare