Monday, March 2, 2020

हे मित्र नालायक असतात... (मराठी)

मगमग काय झालं?”

माझ्या मुलीच्या आश्चर्याने मोठ्या झालेल्या डोळ्यांकडे बघत मी माझा चेहरा अजूनच भीतीदायक केला आणि पुढे सांगू लागलो,” एवढी शांतता होती तिथे आणि त्यात अमावस्येची रात्र... काहीही दिसत नव्हतं... त्याच वेळी लांबून छन छन आवाज येऊ लागला...”

मग?” मुलगा.

मी थोडीच घाबरणार होतोमी पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचलो... वारा जोराने वाहू लागला होता...”

चहा पिऊन घ्या.” पत्नी बोललीमी रागाने तिच्याकडे बघितलंही नेहमी मूड खराब करते.

सांगा ना प्लीज...” मुलगी.

चहाचा कप उचलून मी जसा ओठांना लावलामाझा लंगोट यार आला.

कधी तरी फोन उचलत जा दोस्ता.” मित्र बोलला. “वहिनीएक चहा मला पण.”

अरेमुलांना आपल्या लहानपणीची गोष्ट सांगत होतो.” मी बोललो.

कोणती गोष्टमला पण ऐकायचीय.” मित्र.

काही नाही रे.” मी विषय बदलत बोललो.

तिच गोष्ट तुमच्या लहानपणाचीतुम्हा सर्व मित्रांचीअमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाला हात लावून येण्याची...” माझी मुलगीबोलली.

मी मित्राला बोललो,” ती गोष्ट मी नंतर सांगतोआणि बोलफोन का करत होतास?”

माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मित्र बोलला,” ती गोष्टतुमचा बाप एवढा घाबरला होता की मधूनच पळून परत आला होतात्यानंतर पुढचे किती तरी दिवस रात्री घराच्या बाहेर पण पडत नव्हताकाय बरोबर ना दोस्ता?”

माझी मुलं माझ्या मित्राबरोबर जोरजोरात हसू लागली आणि त्यांच्या हसण्यात चहा घेऊन येणारी माझी पत्नी पण सहभागी झाली.

मी मित्राकडे रागाने बघत हाच विचार करत होतो,” सालाहे मित्र खरंच नालायक असतात.”


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 


#pramodplanet #pramodwaghmare 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...