Wednesday, July 29, 2020

चुक, राग, नुकसान (मराठी)

काॅलेजनंतर जेव्हा मी नवीन जाॅब जाॅईन केलातेव्हा माझे जे बाॅस होते त्यांनी मला दोन गोष्टी समजवल्या होत्याखुपच सोप्या गोष्टीहोत्यापण मला त्या नेहमी उपयोगी पडल्या.


नवीन जाॅब होतातेव्हा मी आणि माझे मित्र सर्व नवे होतोमाझे बाॅस खुपच स्ट्रिक्ट होतेकधी कोणी चुक करत असेतर ते खुपरागावतआम्ही सगळे त्यांना घाबरायचोजसा काळ गेला तसा त्यांची भीती थोडी कमी झाली.


एकदा लंच टाईममध्ये आम्ही नेहमी प्रमाणे एकत्र जेवायला बसलो होतोतेव्हा त्यांनी सांगितले,” हे नेहमी लक्षात ठेवकधीही कोणाचीचुक असेलतर त्या व्यक्तीशी फक्त त्या चुकीबद्दलच बोलायचंत्याला असं नाही म्हणायचं की तू नेहमी असच करतोतुझी ही गोष्टमला आवडत नाहीतुझी ती सवय चुकीची आहेफक्त आणि फक्त त्या चुकीबद्दलच बोलायचे.” रागात आपण काय काय बोलतोअशाही गोष्टी बोलतो ज्यांचा त्या चुकीशी काहीही संबंध नसतो.


दुसरी गोष्ट मी बघितली होतीते कितीही वेळा कोणावर रागावत असतील पण कधीही त्यांनी कोणाचा रिपोर्ट खराब नाही लिहिलात्याबद्दल मी एकदा त्यांना विचारले.


ते बोलले,” बघतू कोणाशी रागाने बोललासचुकून काही चुकीचं बोललासतो व्यक्ती काही दिवसांनी ते विसरून जाईलपण जेव्हातू कोणाचं कागदावर नुकसान करतोसतर ते तू कधी बदलू शकत नाहीतू कागदावर केलेलं नुकसान त्या व्यक्तिला नेहमी त्रास देतराहते.”


आज ते रिटायरमेंटचं आरामदायक जीवन जगत आहेतआजही त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांनी शिकवलेल्या या गोष्टी आठवतात



आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


https://www.facebook.com/pramodplanet/


#simple #pramodwaghmare


https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg


(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...