गेली काही वर्ष, मी बॅंकेत एका असिस्टंट मॅनेजरला बघतोय. जेव्हा कधीही मी त्या बॅंकेत जातो, मी बघितलंय, की बाकीचे कर्मचारी त्यामॅनेजरकडे आपले काही प्रॅाब्लेम्स घेऊन येतात. आणि तो आपली हातातली सर्व कामे सोडून त्यांना मदत करतो. तो खुप चांगला मॅनेजरआहे, पण त्याला ‘नाही’ बोलतां येत नाही. ज्यामुळे त्याची स्वत:ची कामे लेट होतात, रोज रात्री उशिरापर्यंत त्याला काम करावे लागते.
किती वर्ष तो त्याच पदावर काम करत आहे. तुम्ही जर ‘नाही’ म्हणू शकत नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होणे स्वाभाविकआहे. तुमच्यावर कामांचा बोजा वाढतच जाणार.
तुम्ही बिजनेसमध्ये एका वेळी किती कामे वेळेत आणि चांगल्या प्रकारे, क्वालिटीसह करू शकता हे जर तुम्हाला माहित असेल; तर तुम्हीकाही कामांना ‘नाही’ म्हणू शकता. ज्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या क्यायंटला चांगली सर्व्हिस देऊ शकाल आणि काही अनावश्यककामे टाळू शकाल.
ही गोष्ट स्टडीजसाठी विद्यार्थ्यांनासुद्धा लागू होते. मोबाईलपासून मित्र परिवारापर्यंत; अनेक गोष्टी तुम्ही स्टडी करताना टाळू शकता.
तुम्ही ‘नाही’ म्हणताना कोणत्या प्रकारे ‘नाही’ बोलता ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमच्या ‘नाही’मुळे कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व द्वेष उत्पन्नहोऊ नये. ना तुमच्या ‘नाही’मुळे कोणासही असे वाटावे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱी पासून लांब पळत आहात. तुम्ही विनम्रतापूर्वक‘नाही’ म्हणू शकता.
‘हो’ किंवा ‘नाही’ म्हणण्यापुर्वी; तुम्हीं तुमचे लक्ष्य काय आहे आणि तुमची प्राथमिकता काय आहे; याबद्दल विचार करा. त्यानंतरतुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल.
तुम्ही सरळ ‘नाही’ म्हणण्यापेक्षा, तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्ती किंवा दुसऱ्या डिपार्टमेंट किंवा दुसऱ्या संस्थेचे नाव त्या कामासाठीप्रस्तावित करू शकता. किंवा त्यांना काही वेळेसाठी थांबायला सांगू शकता.
तुमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तुम्हाला ‘नाही’ बोलायला शिकणे आवश्यक आहे.
प्रमोद वाघमारे
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
https://www.facebook.com/pramodplanet
(C) Pramod Waghmare
#pramodplanet #simple #pramodwaghmare