तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते...
जर तुम्ही एखादी वस्तू विकत घ्यायला जाता तेव्हा त्या वस्तूची क्वालिटी बघता की किंमत ?
जर तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल की कोणा अननुभवी व्यक्तीचा घ्याल ?
जर तुम्हाला सप्लायर निवडायचा असेल तर तुम्ही थोड्या जास्त रेटमध्ये चांगली क्वालिटी देणारा सप्लायर निवडाल की कमीकिंमतीमध्ये खराब क्वालिटी देणारा सप्लायर निवडाल?
तुम्ही अशा व्यक्तीशी मैत्री कराल जो गोड बोलतो पण दुराचारी आहे की अशा व्यक्तीशी जो बोलायला तिखट आहे पण स्वच्छ मनाचाआहे?
जर तुम्हाला कामात पार्टनरशिप करायची असेल तर तुम्ही प्रामाणिक व्यक्तीबरोबर पार्टनरशिप कराल की कोणा दगाबाज व्यक्तीबरोबर?
जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर तुम्ही त्या विषयातल्या माहितगार व्यक्तीकडून माहिती घ्याल की त्या व्यक्तीकडूनज्याचा त्या विषयाशी काही संबंध नाही ?
बऱ्याचदा ऐकलय की आता नवा जमाना आहे. आता क्वालिटी, अनुभव, तत्व, प्रामाणिकपणा, नितीमत्ता, सिद्धांत, आचार विचार याबद्दलकोणी विचार करत नाही. या गोष्टी आता नष्ट झाल्यात का की या गोष्टी कधीही नष्ट होऊ शकत नाहीत ? तुम्हाला काय वाटतं ?
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/
#simple #pramodwaghmare
https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg
(C) Pramod Waghmare