Sunday, August 9, 2020

नंतर करू... (मराठी)

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा फिल्म मधील एक सीन आहेजो अतिशय सुरेख प्रकारे जीवनाचा एक महत्वाचा पैलू आपल्यासमोर सादरकरतोऋतिक रोशन जो आपल्या लहानपणीच्या अनुभवांमुळे पैसे कमावण्यामध्ये एवढा व्यस्त झालाय की त्याची प्रेमिकासुद्धा त्यालासोडून गेलीयआणि कॅटरीना कैफ जी जीवनाचा आनंद उपभोगत आहे.


एका क्षणीऋतिक आपल्या जीवनाचा प्लॅन सांगतो४० वयानंतर रिटायरमेंट आणि सर्व गोष्टी त्यानंतरत्याचवेळी कॅटरीना त्यालाविचारते की तू ४० वर्षे जगशील हे तुला कसे माहितसीझ  डेपहिल्यांदा हा दिवस जगायला शिक.


काही वर्षांपूर्वी एका मोठ्या बिल्डर मित्राबरोबर बोलणे झाले होतेएका खुप मोठ्या प्लाॅटवर ते डेव्हलपमेंट करणार होतेमी बोललो,” सरतुम्ही यांतील काही जमीन तशीच ठेवाकाही वर्षांनंतर या जमिनीची किंमत खुप वाढेल.”


ते हसत बोलले,” काय करू ठेऊनमी आता ५० वर्षांचा आहेआता डेव्हलप नाही केलीतर नंतर म्हातारपणी डेव्हलप करून कायफायदा?”


आपण सर्व गोष्टी नंतर करू बोलत टाळत राहतोसर्व प्लॅनिंग असते आपलेते काम नंतर करूतिकडे फिरायला जायचेयआत्ता नकोनंतरती कार घ्यायचीयआत्ता नको नंतरतो नेकलेस घ्यायचायआत्ता नको नंतरजसं काय आपल्याला माहित आहे की आपण कितीवर्ष जगणार आहोतनंतर नंतर बोलता बोलता आपण कधी वृद्ध होतो लक्षातच येत नाहीआपण जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंदत्याचवेळी नाही घेतला तर काय फायदा ?



आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


https://www.facebook.com/pramodplanet/


#simple #pramodwaghmare


https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg


(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...