बिल्डिंगच्या खाली खुप गर्दी होती. कोणीतरी मरण पावले होते. दु:खाचं वातावरण होतं. मी जसं माझ्या मित्राने सांगितलं होतं तसात्याला मिस कॅाल केला. मी बघितले एक माणूस तिथे मोठमोठयाने रडत होता. मला वाटलं तो त्याचा मोठा भाऊ असावा. त्याच्याबरोबरउभे काही लोकही रडत होते.
तेव्हाच माझा मित्र गर्दीतून हळूच माझ्या बाईक जवळ आला आणि म्हणाला,” चल, निघू या. ॲाफिसला लेट होईल.”
“बघ किती रडताहेत ते.” मी बोललो.
“ते? तो त्याचा मोठा भाऊ, काही नातलग आणि काही पार्टनर्स आहेत. खुप मोठी माणसं आहेत ती. ज्यांनी त्या मृतकाचे नेहमी वाईटकेलं, धोके दिले. गेली चार वर्ष कधी त्याला भेटले पण नाहीत आणि आज रडण्याचं नाटक करताहेत.” मित्र बोलला.
“पण सर्व लोक तर त्याच्या भावाजवळच जात आहेत.” मी बोललो.
“तेच तर. आणि ते बघ. मृतकाची पत्नी, मुलगा आणि काही मित्र जे नेहमी त्याच्याबरोबर होते; त्यांना भेटायला कोणीच जात नाही.” तोजसं बोलला माझी नजर मृतकाची पत्नी आणि सोबत उभ्या काही व्यक्तींवर पडली.
“चल यार, तू इतना दिल पर मत ले.” माझ्या बाईकच्या मागे बसत मित्र म्हणाला,” दुनिया अशीच असते रे. तू ते गाणे ऐकलंचअसशील... ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?”
हेल्मेट घालून मी ॲाफिसकडे जाऊ लागलो. मनात तेच गाणं सारखं सारखं प्ले होत होतं...
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं...
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/
#simple #pramodwaghmare
https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg
(C) Pramod Waghmare