जिथ पर्यंत नजर जातेय, फक्त वाळवंट दिसतंय...
ना प्राणी, ना पक्षी, ना पाणी, ना हालचाल...
फक्त वाळवंट...
तहान लागलीय खुप... डोक्यावर तळपणारा सूर्य आणि खाली गरम वाळू...
कुठलाच मार्ग दिसत नाहीय... चक्कर येऊ लागलीय...
मला पुन्हा पावसात भिजायचंय...
पुन्हा मित्रांबरोबर गोव्याच्या समुद्रात उड्या मारायच्यात...
पुन्हा पत्नीमुलाबरोबर कॅार्बेटच्या जंगलात उघड्या जीपमधून फिरायचंय...
रात्र रात्र भर गप्पा मारायच्यात...
चौपाटीवर पाणीपुरी खायचीय...
गर्द जंगलात खुप भटकायचंय...
झाडाच्या सावलीत झोपून एखादं चांगलं पुस्तक वाचायचंय...
पर्वतावर उभं राहून मोठमोठ्याने किंचाळायचंय...
ती स्वच्छ हवा छातीत भरून घ्यायचीय...
हो, मी करणार आहे हे... माझा माझ्यावर विश्वास आहे...
समोर प्रकाश दिसतोय... पाणी दिसतंय...
काही उंट, काही माणसं दिसताहेत मला...
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/
#simple #pramodwaghmare
https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg
(C) Pramod Waghmare