Saturday, October 3, 2020

पूर्ण सत्य (मराठी)

सत्य काय असतंतुम्हाला जे माहित असतंज्याचा तुम्ही विचार करतातुम्हाला जे दाखवलं जातं तेच सत्य असतं का


कधीतरी एक गोष्ट वाचली होतीसत्य आणि आपला दृष्टिकोन perspective कसा असतो ते अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणारी हीगोष्ट.


एका हत्ती आणि पाच आंधळ्यांचीएकदा पाच आंधळे हत्ती बघायला गेले.


एकाने हत्तीच्या सोंडेला हात लावलातर त्याला वाटलं की हत्ती सोंडेसारखा असतोदुसऱ्याने हत्तीच्या पायांना स्पर्श केला तर त्यालावाटलं की हत्ती पायांसारखा आहेतिसऱ्याने कानांना हात लावलाचौथ्याने दातांनाआणि पाचव्याने शेपटीला हात लावला.


थोड्या वेळाने कोणी त्यांना विचारले की हत्ती कसा होतातर प्रत्येक आंधळ्याने त्याने जसं अनुभवलं तसंच हत्तीचं वर्णन केलं आणिथोड्या वेळातच पाचही जण एकमेकांशी भांडू लागले की त्यांनाच माहिती आहे की हत्ती कसा असतो


ते सर्व आपल्या जागी बरोबर होतेकारण त्यांनी जे अनुभवलं तेच त्यांच्यासाठी सत्य होतं.


सत्य पण हत्तीसारखंच असतंविशालआपल्या डोळ्यांवर पट्ट्या असतातकधी प्रेमाचीकधी मैत्रीचीकधी कपटीपणाचीकधीलालचीपणाचीकधी विचारांची विचारधारांचीकधी कोणी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते


या पट्ट्यांमुळे एका छोट्याशा अंगालाच आपण पूर्ण खरे सत्य मानतोपण सत्य खुप मोठं असतं.


पूर्ण सत्य समजण्यासाठी आपल्याला या पट्ट्या खोलाव्या लागतीलज्या आपल्याला पूर्ण सत्य समजण्यात बाधा उत्पन्न करताततेव्हाच आपला दृष्टीकोन बदलेलतेव्हाच आपण पाहू शकू पूर्ण सत्य.



आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


https://www.facebook.com/pramodplanet/


#simple #pramodwaghmare


https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg


(C) Pramod Waghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...