Saturday, November 16, 2019

आता प्लॅस्टीक पेट बाॅटल्स कमी करूयात...(मराठी)


आज जम्मु एअरपोर्टवर एक खुपच चांगली गोष्ट नजरेस आली. ती म्हणजे प्लॅस्टिक पेट बॉटल्स श्रेडर मशीन. ही मशीन प्लॅस्टिक बाॅटल्सचे छोटे छोटे तुकडे करते.

मदुराईच्या एम जी आर बस टर्मिनल मधेही असेच एक मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनमधे रिसायकल केलेले प्लॅस्टिक रोड बनविण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी आणि इतर अनेक प्रकारे उपयोगात आणले जाऊ शकते. मदुराई नगरपालिकेने रस्ते बनविण्यासाठी श्रेडेड प्लॅस्टिकचा वापर अनिवार्य केला आहे. प्लॅस्टिकच्या वापरामुळे रस्ते जास्त टिकाऊ होतात.

पुद्दुचेरी रेल्वे स्टेशनमधेही प्लॅस्टिक क्रशर मशीन बसविण्यात आले आहे.

भारत सरकारने आणि आपण सर्वांनी वन टाईम प्लास्टिक बॅगांचा उपयोग खुप कमी केला आहे आणि त्याचे खुप चांगले परिणाम आपल्याला पुढील वर्षांत नक्कीच दिसून येतील.

आपण प्लॅस्टिक बाॅटल्सने पाणी शीत पेय कोल्ड्रींक्स पितो. ह्या बाटल्या जर आपण मशीन्समधे श्रेड केल्या तर आपणही प्लॅस्टिक प्रदूषण कमी करू शकतो.

सोबत या प्लॅस्टिकचा वापर करून चांगले टिकाऊ रस्ते आणि कपड्यासह इतर गोष्टींसाठी याचा उपयोग करता येईल. (भारतीय क्रिकेट टीमचे टी शर्ट्स रिसायकल्ड प्लॅस्टिकपासून बनविण्यात आले आहेत.)

या प्रकारच्या मशीन्स भारतात ठिकठिकाणी बसवल्यास पेट बाॅटल्सचे प्रदुषणही आपण कमी करू शकू हे निश्चित !!!


प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests



इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...