Monday, February 10, 2020

विना तक्रार (मराठी)

मी ठरवलंआज दिवसभर मी कोणतीही तक्रार करणार नाही.

काम करता करता धाम पुसत पत्नी म्हणाली,” आज स्कूलबस येणार नाहीजाताना मुलांना स्कूलमध्ये ड्राॅप करून जा आणि घरखर्चासाठी थोडे पैसे द्या.”

मी तिला बधितलंती पण घरची सर्व कामे आवरून ॲाफिसला जाण्याच्या गडबडीत होतीमहागाई पण वाढली आहेमी काही बोललोनाहीतिला मी थोडे पैसे दिले.

ट्रॅफिकमध्ये मुलांना स्कूलमध्ये सोडल्यानंतर मी ॲाफिसला लेट पोहोचलोबाॅसचं कडवट बोलणं ऐकून माझ्या चेअरवर मी बसलोचहोतो तर कळालं की आज परत सरकारी ॲाफिसला जावं लागणार.

विना तक्रार मी सरकारी कार्यालयात पोहोचलोआता सरकारी ॲाफिसेस किती चकचकीत असतातआणि आता सर्व ॲानलाईनझालंयक्या बात है.

अर्ध्या तासाने क्लार्कची भेट झालीमी तीन चार वेळा आधीच तेथे येऊन गेलो होतोआम्ही ॲानलाईन सर्व काही सबमिट केलं होतंपणत्यांची कुठलीतरी क्वेरी होतीत्यांनी मोठ्या अधिकार्यांना भेटायला सांगितलं.

मोठे अधिकारी मिटींगमध्ये होतेदोन तास विना तक्रार वाट बघितल्यानंतर त्यांची भेट झालीत्यांनी सांगितलं की काम होऊन जाईलआणि दोन दिवसांनी परत बोलवलंविना तक्रार मी ॲाफिसला परत आलो.

दिवसभराची कामे संपवता संपवता लंचपण करू शकलो नाहीत्यातच बॅंकेतून फोन आलाहोम लोनचे इएमआय वाढले होतेमुलांनास्कूलमधून पिकअप करून मी घरी पोहोचलोपत्नीपण ॲाफिसमधून थकून भागून घरी पोहोचली होती.

मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर गप्पा मारताना मी विचार करत होतो की विना तक्रार आजचा दिवस किती छान गेलाविचार करता करताकधी डोळा लागला कळलंच नाही.


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 


#pramodplanet #pramodwaghmare 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...