एक जातक कथा आहे.
एक गारूडी होता. त्याच्याकडे एक माकड होतं आणि एक साप.
गावोगावी जाऊन तो त्यांचे खेळ करायचा. जेव्हा पण माकड चुक करत असे, गारूडी त्याला काठीने मारायचा.
एकदा दुपारी खेळानंतर जेवण करून गारूडी एका झाडाच्या सावलीत झोपला. चुकून तो माकडाला बांधायला विसरला. हे बघून माकडझाडावर चढलं.
गारूड्याने जसं माकडाला झाडावर चढलेले बघितलं, तो खुपच प्रेमाने गोड शब्दांत माकडाला म्हणाला,” माकडा बाळा, तू तिथे कागेलास? मला कोणही पुत्र नाही. तू तर माझ्या मुलासारखा आहेस. माझ्या नंतर माझं सगळं तुझेच होणार. तू माझ्याकडे परत ये.”
गारूड्याचे गोड बोलणं ऐकून माकड म्हणाला,” गारूडी, तू माझ्याबरोबर गोड बोलत आहेस. पण मी तुझ्या काठीचा मार विसरलेलोनाही. तुझ्या संपत्ती पेक्षा मला या अरण्यात आनंदाने विहार करणे जास्त आवडते.” असं म्हणत तो अरण्यात गायब झाला.
हे पंचतंत्र, हितोपदेश, जातक कथा फक्त लहान मुलांसाठीच असतात का?
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare