काॅलेज कॅंटीननध्ये जसं त्याने आपल्या मित्राला सांगितलं, मित्र भडकला.
“पण तू तिच्यावर किती प्रेम करतोस.”
“अगदी खरं आहे. मी खुप प्रेम करतो तिच्यावर.
“मग? ती सरळ तुला नाही म्हणून निघून गेली?”
“हो. तिचं माझ्यावर प्रेम नाही.”
“तिच्यासाठी काय काय केलंस तू आणि ती तुला येडा बनवून निघून गेली. तू तर खरोखर वेडा आहेस.”
“तिने क्लिअरली सांगितलं. ती माझ्यावर प्रेम करत नाही.”
“मग जा. तिला परत समजव. मर्द बन जरा. बोल तिला तू माझी झाली नाहीस तर...”
“माझी झाली नाहीस तर? हे काय बोलतोस तू? मी तिच्यावर प्रेम करतो, त्याचा अर्थ असा नाही की तिने पण माझ्यावर प्रेम केलेचपाहिजे. तिने कोणावर प्रेम करावे हा तिचा चाॅईस आहे. यार, तुझी मर्दानगी तू तुझ्याकडेच ठेव.”
बोलत उठता उठता तो मित्राला बोलला,”चल, आता लेक्चरचं टाईम झाला.”
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare