“मला नाही वाटत माझं तिच्याबरोबर जमू शकेल.” माझा पुतण्या मला सांगत होता.
“आता काय झालं? तुमच्या लग्नाला ६ महिनेपण नाही झालेत.” मी बोललो.
“खुप चिडचिडी झालीय ती. मला उलटी उत्तरे देते. घरात लक्ष देत नाही.”
“तुला काय कारण वाटतेय ?” माझी पत्नी त्याला चहाचा कप देत बोलली.
“माहित नाही. काही समजत नाही.” पुतण्या.
मी “ तर मग एक काम कर. जेव्हा तुम्ही दोघे फ्री असाल, त्यावेळी तिच्याजवळ शांतपणे बसून तिचं बोलणं तक्रारी ऐक. फक्त एककंडीशन आहे; बोलणं पूर्ण प्रामाणिकपणे ऐकायचे आणि ते सुद्धा तिच्या बोलण्यात अडथळे न आणता.”
“बस? त्याने काय होईल?” पुतण्याने विचारले.
“ट्राय तर करून बघ.” माझी पत्नी बोलली.
“आणि हो, या शनिवारी आमच्या लग्नाचा एकवीसावा वाढदिवस आहे. दोघे नक्की या.” मी सांगितले.
शनिवारी दोघे आले त्या वेळी खुप आनंदी दिसत होते. मी पुतण्याला विचारले,” सर्व ठीक आहे ना? बोलणं झालं?”
“बिलकुल. एक तास ती बोलत होती. माझ्या चांगल्या वाईट गोष्टी, माझ्या तक्रारी.” पुतण्या बोलला.
“मग?” मी विचारले.
“मग? माझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.” हसत तो बोलला.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare