माझी मुलगी आली माझ्याकडे. चेहर्यावर चिंता. ऑफिस मध्ये काही तरी बिनसलंय हे लक्षात आलं माझ्या.
मी: "काय झालं गं?"
मुलगी: "माझा ऑफिस मधला मित्र आहे. खुप काम करतो, प्रामाणिक आहे, हुशार आहे."
मी: "बरं मग?"
मुलगी: "आज बॉसने मला बोलावलं होतं. तो माझ्या मित्राला डावलून मला प्रमोशन देतोय. मला माहित आहे की माझा मित्र खुप डिजर्विंग आहे. तो एक दिवस कंपनीत बॉस पेक्षाही पुढे जाऊ शकतो. मी प्रमोशन घेऊ की बाॅसला नको म्हणू?"
मी: "मी तुला एक गोष्ट सांगतो.
एकदा एका राजाने १० दिवस आंघोऴ नाही केली. त्याच्या अंगाला घाण वास येऊ लागला. राणीने तसं सांगितलं. पण राजाला राग आला.
त्याने एका एका सरदाराला बोलावलं आणि विचारलं. वास येतोय असं बोललं की राजा त्या सरदाराला शिक्षा द्यायचा. तेवढयात राजाचा प्रधान तिथे आला. राजाने त्यालाही विचारलं. प्रधान बोलला," राजा, मला दोन दिवस सर्दी झालीय. माझं नाक बंद झालंय. त्यामुळे मला वास घेता येत नाही."
आजकाल आपल्या फायद्यासाठी लोक सर्दी झाल्याचं सोंग घेतात. शेवटी तू काय करायचं हा तुझा निर्णय आहे."
तुम्हाला काय वाटतं? माझ्या मुलीनं काय करावं? आपले अभिप्राय नक्की लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://pramodplanet.blogspot.com/
#pramodplanet #pramodwaghmare