Sunday, December 1, 2019

आत्मसन्मान (मराठी)

तो आता त्याच्या चुलत्यांना घेऊन आला होतात्याच्या बोलण्यात तीच गुर्मी.

चुलते बोलले, “हे बघ कोर्टाचा निकाल याच्या बाजूनेच लागेल उद्यामुलाची कस्टडी पण त्याच्याकडेच जाईलबघ शांतपणे विचार करचल परतसर्व ठीक होईल.”

मला आयुष्यातली मागली आठ वर्षे झर्रकन नजरेसमोरून गेली.

लग्नआम्ही दोघेही इंजिनीअरसाॅफ्टवेअर कंपनीत दोघांचे जाॅब्जएक वर्षात मुलमाझे नोकरीतले यश आणि सोबत माझी भरभरहोणारी प्रमोशन्सत्याची वाढलेली चिडचिडअसुयाचार चौघात माझा अपमान आणि मला कमी दाखवण्यासाठी त्याचे प्रयत्नत्याचीगुर्मीत्याचा अहंकार.

मागल्या वर्षी सर्व असह्य झाले आणि मुलासह घर सोडलेकोर्टात उद्या निकाल लागणार होता.

तो,” हे बघनेहमी सारखी मूर्खपणे वागू नकोसतू हरशीलचशिवाय मुलाची कस्टडी मलाच मिळणार.”

मी मुलाशिवाय कशी राहू शकेनमला परत जावंच लागेलबॅग भरून मी बाहेर आले.

परत कानात गुंजू लागले त्याचे शब्दपुन्हा मला आठवला त्याचा अहंकारत्याने पदोपदी केलेला माझा अपमानतो तोच पुरूष होतातो बिलकुल बदलला नव्हता.

आणि माझे पाय तिथेच थांबले ...


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏


#pramodplanet 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...