Saturday, December 21, 2019

स्पेशल स्वेटर (मराठी)

ख्रिसमसच्या सुट्टयांमुळे हाॅटेलमध्ये चेक इनसाठी प्रचंड गर्दी झाली होतीएकदम खुप जण आल्यामुळे हाॅटेलच्या स्टाफवर ताण आलाहोतात्या थंडीत आणि एसीतही काम करताना त्यांना घाम फुटत होतात्यात काही कस्टमर्स चिडून भांडत होते.

वातावरण तणावपूर्ण होतंत्याचवेळी आत केबिन मधून एक वयस्कर व्यक्ती बाहेर आलीनीटनेटके कपडे घातलेलेत्यांना बघून बाकीस्टाफ आदरयुक्त नजरेने त्यांना बघू लागलाशांतपणे ते स्टाफला कामे लावू लागलेपंधरा मिनिटातच तणाव निवळलासर्व जण कामकरू लागले.

या वयातही त्यांची एनर्जी आणि कामाप्रति निष्ठा बघण्यासारखी होतीमाझापण त्यांच्याबद्दल आदर वाढू लागलाथोड्या वेळाने मीत्यांच्याकडे गेलोका कुणास ठाऊक माझं लक्ष त्यांच्या स्वेटरकडे जात होतं.

मी, “किती व्यवस्थित काम करता तुम्ही.”

” थॅंक्स.” काम करता करता वर बघत ते म्हणाले आणि परत काम करू लागले.

मी पुन्हा बोललो, “तुमचं स्वेटर खुपच छान आहेजुने डिझाईन आहेपण खुप वेगळं आणि फार छान दिसतंयस्पेशल स्वेटर दिसतंयहे.”

माझं वाक्य ऐकून झटकन त्यांनी वर बघितलंत्यांच्या डोळ्यात आनंदाची वेगळीच चमक होती. “होस्पेशल स्वेटर आहे हेमाझ्याबायकोने खुप प्रेमाने स्वत:च्या हाताने विणून गीफ्ट दिलं होतं मलाआयुष्यभर खुप प्रेम दिलं तिने मलानेहमी माझ्यासोबत उभी राहिलीतीमागच्या वर्षी गेली ती...”

त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतंपण त्याच वेळी हसत त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, “तुम्ही माझ्या स्वेटरचं कौतुककेलंत आणि मला माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीची आठवण करून दिलीतखुप खुप आभार तुमचे.”

त्यांना पाणावल्या डोळ्यांनी हसत माझ्याकडे बघताना बघून माझेही डोळे पाणावले...


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #pramodwaghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...