आजकालच्या कार. किती अप्रतिम टेक्नाॅलाॅजी आहे यांत. पेट्रोल डीझेल आणि आता बॅटरीवर विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स. इंजिन, त्याच्याशी जोडलेले सर्व छोटे मोठे पार्टस्, टायर, एसी आणि आता सर्व ऑटोमॅटीक कंट्रोल. हा एक एक पार्ट एकमेकांशीजोडलेला आहे. किती सुलभपणे हे सर्व आपले आपले काम करतात...
आपले शरीर. मेंदू, मज्जा संस्था, स्नायू, हृदय, हाडे, फुप्फुस सर्व एक साथ काम करते. रक्त अणु आणि छोट्या छोट्या पेशी. आपल्याशरीरातली प्रत्येक पेशी काही दिवसांनी मरते आणि नव्या पेशी जन्म घेतात. कसं काम करतात हे सर्व? किती सहजतेने...
ही पृथ्वी स्वत: फिरते. हजारो लाखो वर्षांपासून. तिला प्रदक्षिणा घालणारा चंद्रमा. आपला प्रकाश कधीही कमी न होणारा तो सूर्य. आणि त्याच्या भोवती फिरणारे सर्व ग्रह. मोठ्या मोठ्या गॅलक्सी ब्रह्मांड अंतराळ. आणि हे सर्व जिथे न हवा न इतर काही. कसं होतं हेसगळं? काय माहित...
किती मोठं युनिवर्स आहे हे...
मेन इन ब्लॅक या चित्रपटात ओरियन नावाच्या मांजरीच्या गळ्यातल्या पट्ट्यातल्या लाॅकेटमध्ये एक गॅलक्सी दाखवलीय.
किती मोठे आहोत आपण की किती छोटे?
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://pramodplanet.blogspot.com/
#pramodplanet #pramodwaghmare