Monday, December 9, 2019

बकरी चोर (मराठी)

एकदा एका शेतकऱ्याने बाजारातून एक बकरी विकत घेतली आणि तिला खांद्यावर घेऊन तो शेतांमधून चालत चालत आपल्या घरीनिघालातेवढ्यात तीन चोरांची त्याच्यावर नजर पडलीबकरी चोरण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली.

पहिल्यांदा पहिला चोर शेतकऱ्याकडे गेला आणि बोलला, “अरे तुम्ही तर फार दयाळू आहातया कुत्र्याला खांद्यावर घेऊन चाल्लात.” शेतकऱ्याने त्याचे बोलणं हसण्यावारी नेलं.

थोड्या वेळाने दुसरा चोर शेतकऱ्याजवळ आला आणि त्याने शेतकऱ्याला विचारले, “या कुत्र्याला तुम्ही खांद्यावर का घेऊन चाललाआहात?” शेतकऱ्याच्या मनात शंकेची पास चुकचुकली.

थोड्या वेळाने तिसरा चोर त्याला भेटला, “ हा कुत्रा आजारी आहे कातुम्ही याला खांद्यावर उचलून का घेऊन जात आहात?” आता मात्रशेतकरी घाबरलाकाही तरी गडबड आहेया कुत्र्याने नक्कीच बकरीचं रूप घेतलंयअसा विचार करून त्याने बकरीला तिथेच टाकलीआणि धावतच तो घरी परत गेलाआणि अशा प्रकारे त्या तिन्ही चोरांनी अतिशय चलाखीने बकरी चोरली.

आपल्या आजूबाजूला देखील असेच बकरी चोर आढळतातआपल्या फायद्यासाठी आपल्याला फसवणारेआपल्याला भटकवणारेकधी ते आपल्या बाॅसची निंदा करतातकधी कामाला नावे ठेवतातकधी आपल्याला चुकीचे सल्ले देतातकधी आपल्या मित्रांबद्दलखोटनाटं सांगतातशेवटी आपला स्वत:वरचा आत्मविश्वासच आपल्याला सफलता देतो.

आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


#pramodplanet

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...