शाळेसमोर खुप ट्रॅफिक होती. म्हणून एका हाॅस्पीटलसमोर रस्त्यावर त्याने त्याची ॲाटो रिक्षा लावली आणि घाईघाईने तो शाळेकडेनिघाला. शाळेतून सारखा फोन येत होता त्याला.
त्याची मुलगी आता ७वी मध्ये शिकत होती. आपण कमी शिकलो तरी आपली एकुलती एक मुलगी खुप शिकून मोठी व्हावी अशी खुपइच्छा होती त्याची. म्हणूनच शहरातल्या मोठ्या शाळेत त्याने तिला टाकले होते. खुप कष्ट करून तिच्या शिक्षणाचा फी चा खर्च तो करतहोता.
मुलगी पण खुपच हुशार होती, खुप अभ्यास करत होती. वर्गात नेहमी पहिला नंबर होता तिचा.
काल रात्री त्याच्या मुलीने सांगितले. जर फी भरली नाही तर तिला शाळेतून काढण्यात येईल. वाढलेली फी आणि आजारपणामुळे यावर्षात तो वेळेवर फी भरू शकला नव्हता. सकाळपासून कसे बसे उधार घेऊन त्याने २५ हजार रुपये जमा केले आणि ते पैसे घेऊन तोशाळेकडे चालला होता.
जाता जाता हाॅस्पिटलच्या दरवाजातच त्याच्या मुलीच्याच वयाची एक मुलगी डाॅक्टरला विनवण्या करताना दिसली,” डाॅक्टर प्लीज मलामदत करा. माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. माझ्या आईला वाचवा.” तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
डाॅक्टर तिला म्हणाले,” मी काही करू शकत नाही. ॲापरेशनचे २५,००० भर, लगेच ॲापरेशन करू.”
का कुणास ठाऊक त्याचे पाय थांबले. तो त्या मुलीजवळ गेला. तिची विचारपुस केली. नकळतपणे त्याचा हात खिशात गेला आणि त्यानेतिच्या ॲापरेशनचे पैसे हाॅस्पिटलमध्ये भरले. मुलीने त्याला हात जोडून त्याचे आभार मानले.
शाळेत जाताना त्याच्या छातीत धडधड होत होती. काय होईल आता? मी असं कसं वागलो? माझ्या मुलीला काढून टाकतील का? विचारकरता करता तो शाळेत गेला. त्याला मुख्याध्यापिकेंनी बोलावले होते ॲॅाफिसमध्ये.
ॲाफिसात शिरताच मुख्याध्यापिका बाईंनी त्याला विचारले,” अहो सकाळपासून फोन करतोय आम्ही तुम्हाला. फोन का नाहीउचलला?”
“माफ करा मला.” बोलता बोलता त्याची नजर खाली झुकली. त्याला दरदरून घाम फुटला होता. आता काय बोलावं?
त्याच वेळी बाईच बोलल्या, “अहो, तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची होती. एका मोठ्या कंपनीने एक स्पर्धा घेतली होती आणि तुमच्यामुलीसह आणखी दोन मुली सिलेक्ट झाल्या. या तिन्ही मुलींचा पदवीपर्यंत पूर्ण खर्च कंपनी करणार आहे आणि शिवाय दर महिन्यालाएक हजार शिष्यवृत्तीपण तिला मिळेल.”
हात जोडत आनंदाने त्याने डोळे मिटले. त्याच क्षणी हात जोडून त्याचे आभार मानणारी ती मुलगी त्याच्या नजरेसमोर आली !!!
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
#pramodplanet