छोट्या छोट्या गप्पागोष्टी पण किती शिकवून जातात.
काही दिवसांपूर्वी शिवनेरी बसने प्रवास करत होतो. दोन तरूण त्यांच्या बाईक्स बस समोर आडव्या तिडव्या चालवत होते आणिड्रायव्हरला चिडवत होते.
ड्रायव्हरचे वय पन्नासच्या आसपास असावं. ते खुपच संयमाने गाडी चालवत होते.
मी बोललो, “कशी गाडी चालवतात ही मुलं. तुम्हाला राग नाही येत?”
ड्रायव्हर बोलले, “सर, ते कशीही गाडी चालवू देत, त्यांना हे माहिती नाही की माझ्या गाडीने त्यांना थोडंही टच केलं तर त्यांचे कायहोईल. पण ते मला माहित आहे. म्हणून मी त्यांच्यासह चिडणार नाही.”
खरं तर आहे. आपली पाॅवर, आपली ताकदीने आपण कोणाचंही वाईट करू शकतो. पण आपली ताकद, आपल्या पाॅवरने कधी कोणाचेवाईट होऊ नये, हा संयम हीच तर आपली सर्वात मोठी ताकद आहे.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare