त्या वेळी मी खुपच तणावाखाली होतो. कंपनीच्या एका मोठ्या क्लायंटचे साॅफ्टवेअरचे काम आमच्याकडून लेट झाले होते. त्यांच्याशीथोड्या वेळातच मिटिंग होती.
ट्रॅफिक मध्ये माझी कार थांबली आणि माझं लक्ष बस स्टाॅपवर उभ्या शाळेच्या विद्यार्थ्यांवर गेले. दोन मुली आणि एक मुलगा. तिघेहीमुके होते. हातवाऱ्यांनी एकमेकांशी बोलत होते. किती आनंदी होते ते. माहित नाही काय बोलत होते पण खुप हसत होते.
फक्त काही क्षण मी त्यांना बघत होतो. माझा तणाव निवळला आणि मी हसू लागलो.
ऑफ़िसमध्ये पोहोचलो आणि माझी सर्वात हुशार मॅनेजर माझ्यासमोर आली,” सर खुप टेंशन आहे. काय होईल कळत नाही.”
मी फक्त तिला बघत हसलो आणि बोललो,” काही नाही होणार. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.”
ती हसली. तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही तणाव नव्हता. क्लायंट बरोबरची मिटिंग खुपच आरामात झाली.
आणि मिटिंग नंतर सगळेच हसत होते. खरंच आहे हे आनंद सुगंधासारखा सर्वत्र दरवळत जातो.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare