ॲग्रो टुरिझमसाठी आलेल्या सर्व लोकांना तो शेतकरी खुप आनंदाने बघत होता. आता कोणी शेतीही करत नाही आणि कोणी गावीहीजात नाही. शहरातली तरूणाई, फॅमिली आणि मुलं ज्यांना गाव शेती माहिती नाही, ते गावात राहण्याचा छोटासा अनुभव घेत होते. त्याशेतकऱ्याने आपल्या गावकऱ्यांना घेऊन काही वर्षांपूर्वी हे ॲग्रो टुरिझम चालू केले होते.
“मला तू इथे का घेऊन आलाय ?” त्या तरूणीचा आवाज ऐकून शेतकऱ्याचे लक्ष दोघांवर गेले. दोघेही जवळपास २५चे असावेत.
तरूण बोलला,” कम्माॅन, आपण इथे वीकेंड पिकनिकसाठी आलोय.”
तरूणी,” तू कुठे पिकनिक करतोय? तुझं लक्ष तर तुझ्या मोबाईलवरच आहे.”
तरूण, “माझं काम आहे, मला कामाचे फोन येत आहेत.”
तरूणी,” तू सुट्टीवर आहेस. मी पण सुट्टीवर आहे. तू नेहमी असंच करतोस. माझ्यासाठी तू थोडाही वेळ देऊ शकत नाहीस का?” असंबोलून ती रागाने निघून गेली.
“मुला, जरा माझ्याजवळ येशील का?” ऐकून त्याने त्या वृद्ध शेतकऱ्याकडे बघितलं.
“बोला.”
“माफ तर मुला, तुला विचारतोय. तू खरंच त्या मुलीवर प्रेम करतोस का?”
“हो, खुप करतो.”
“मुला, ते तिथं एक रोप दिसतंय तुला?” एका कोपऱ्यातलं एक रोपटं दाखवत तो बोलला.
“ते सुकलेलं रोप?”
“हो मुला, तेच ते सुकलेलं रोप. त्यावर खुप आकर्षक आणि सुगंधी फुलं फुलायची. किती वेळ मी इथे आरामात आनंदाने बसायचो. मलावाटायचं की हे रोप मला नेहमी असाच आनंद देत राहील.”
“मग?” युवक.
“या रोपांना पाणी द्यावं लागतं. खत द्यावं लागतं. कीटक नाशकांची फवारणी करावी लागते आणि खुप सारं प्रेम द्यावं लागतं. बस, मीलक्ष दिलं नाही आणि ते मरून गेलं. आता मी कितीही पाणी दिलं, खत दिलं, तरी आता ते कधीच जिवंत होऊ शकणार नाही. मुला, बसएवढंच.”
“समजलं मला. तुमचे खुप आभार.” बोलत त्याने आपला मोबाईल स्विचॲाफ केला आणि आपल्या प्रेयसीकडे जाऊ लागला.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare