आता त्या सेमिनार मध्ये सर्व जण बोअर होऊ लागले होते. अर्ध्या तासाने लंच ब्रेक होता. सगळे घड्याळात बघत होते. आता लास्ट प्रेझेन्टेशन होतं आणि ते द्यायला ती आली.
किती वर्ष झाली. आजही ती तेवढीच सुंदर. तेवढीच ब्रिलियंट. तिने प्रेझेंटेशन चालू केले आणि पूर्ण वातावरणच बदललं. आता लोक कधी टाळ्या वाजवत होते, कधी हसत होते.
त्याच वेळी तिने मला बघितलं आणि बोलता बोलता ती थांबली. मला बघून ती हसली. आता सर्वजण मला बघू लागले. तिने पुन्हा बोलायला सुरूवात केली आणि मला काॅलेजचे ते दिवस आठवू लागले.
ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. नेहमी मला साथ द्यायची, मला स्टडीज मध्ये मदत करायची, माझ्यासाठी मित्रांशी भांडायची आणि खुपच ब्रिलियंट. मी मनातून खुप प्रेम करायचो तिच्यावर. पण हृदयातली ही गोष्ट मी तिला कधीच सांगू शकलो नाही. ती पुढील शिक्षणासाठी युएसला गेली आणि आता इतक्या वर्षांनी मी आज तिला बघत होतो.
प्रेझेंटेशन झाल्याबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात ती जवळजवळ धावतच माझ्याजवळ आली.
"कुठे होतास इतकी वर्षे तू? चल तुझ्याशी खुप काही बोलायचंय." आणि मी काही बोलायच्या आतच ती माझा हात पकडून मला खेचतच हाॅलबाहेर घेऊन गेली.
बाहेर एका कॅफेत बसताच तिनं विचारलं,"आता सांग." आणि त्यानंतरचा अर्धा तास आम्ही लहान मुलांसारख्या गप्पा मारत होतो. मोठ्या कंपनीत नोकरी, चांगला पती आणि एक मुलगा पण होता तिला. मी पण माझा जॉब, पत्नी आणि माझ्या मुलीबद्दल सांगितलं. लंच ब्रेक कधी संपला लक्षातच आलं नाही.
"चल आता जावं लागेल. कॉन्टॅक्टमधे रहा." खुर्चीतून उठता उठता ती बोलली," मी काॅलेजमध्ये नेहमी वाट पाहत राहिले की एक दिवस तू मला प्रपोज करशील. जर का..." आणि माझ्याकडे बघून हसतच ती हॉलकडे चालत गेली.
"जर का..." म्हणत मी माझ्या पत्नीचा मला येणारा फोन रिसिव्ह केला आणि तिच्याशी बोलू लागलो.
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
आपले अभिप्राय ज़रुर लिहा 🙏🙏🙏
https://pramodplanet.blogspot.com/
#pramodplanet #pramodwaghmare