Thursday, January 2, 2020

श्वास (मराठी)

आता रात्रीचे अकरा वाजले होतेऑफिसमध्ये अजूनही सर्व जण काम करत होतेउद्या कंपनीचे इंटरनॅशनल क्लायंटचे हेड येणार होतेउद्याची मिटिंग कंपनीसाठी सर्वात महत्वाची होतीम्हणून मी पण स्वतॲाफिसमध्ये थांबलो होतोगेली तीन वर्षे मी माझे पूर्ण लक्षकामात घातले होते.

त्याच वेळी मला फोन आलामाझी एक ॲाफिस वर्कर अजूनही काम करत होतीती प्रेग्नंट होतीउद्याच्या मिटिंगमुळे ती सुट्टी सोडूनआज आली होतीतिला अचानक लेबर पेन चालू झाले.

बाहेर शहरात अशांती होतीॲंब्युलंससुद्धा बराच वेळ झाला तरी येत नव्हतीकिती महत्वाची मिटिंग होती उद्यामी झटकन उठलोएकमहिला कर्मचारी आणि एका पुरुष कर्मचाऱ्याला बरोबर घेऊन तिला आम्ही माझ्या कारमध्ये बसवले आणि मी कार चालवतहाॅस्पिटलच्या दिशेने निघालो.

पोलिस नाकाबंदी होती ठिकठिकाणीते सर्व पार करत आम्ही  हाॅस्पिटलमध्ये पोहोचलोतो पर्यंत ॲाफिसमधून फोन गेल्यामुळे तिचापती पहिल्यादाच तिथे पोहोचलेला होताडाॅक्टर इमर्जन्सीमध्ये तिला आत घेऊन गेले.

माझ्या नजरे समोर आजही ती दृश्य हलत नव्हतीतीन वर्षांपूर्वी ॲाफिसमध्ये मी असंच काम करत होतोकुठलंतरी महत्वाचं प्रेझेंटेशनहोतंअशीच अशांती शहरात होतीमाझी पत्नी मला सारखे फोन करत होतीमी येतोय मी म्हणत राहिलोकाम पूर्ण करून मी जेव्हाहाॅस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा  माझी पत्नी होती आणि  माझं बाळ होतं...

आज किती वर्षांनी मी श्वास घेतोय याची मला जाणीव होत होती.


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #pramodwaghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...