“सकाळपासून तुला काॅल करतोय. तुझा मोबाईल बंद होता. म्हणून इथे आलो.” माझा मित्र माझ्याकडे येत बोलला.
“पहिलं आरामात बस.” त्याच्या चेहऱ्यावरचा घाम बघून मी त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला आणि बोलले,” काॅन्फरन्ससाठी गेलेहोते. सकाळी फ्लाईट मधे होते. एअरपोर्टवरून सरळ ॲाफिसला आले. बोल. काही प्राॅब्लेम?”
“तुला त्रास द्यायची इच्छा नव्हती. पण एका कंपनीत माझे पेमेंट अडकलंय. आणि दुसऱ्या कंपनीची ॲार्डरपण पूर्ण करायचीय.”
“ओके. मग?”
“आत्ता मला पाच लाख रूपयांची खुप गरज आहे. मी एक महिन्यात तुला परत करेन. प्लीज.”
मी माझं अकाउंट चेक करून त्याला दोन चेक दिले,” आत्ता तर माझ्या अकाउंटमधे तीन लाख आहेत आणि माझ्या एफडीचे दोन लाखउद्या येतील. त्याचा उद्याच्या तारखेचा हा दुसरा चेक.” दोन्ही चेक मी त्याला दिले.
तो चेक घेऊन जसा गेला, माझ्या ॲाफिसची मैत्रिण मला म्हणाली,” तू असेच कसे पैसे दिलेस त्याला? तुला माहित आहे ना ती लोकंकशी असतात ते? ते लोक कधी तुला धोका देतील तुला कळणार पण नाही.”
“कोण आहेत ती लोकं? हा माझा काॅलेजपासूनचा मित्र आहे. एवढा मेहनती आणि इमानदार माणूस मी कधी बघितला नाही. जेव्हामाझी आपली लोकं माझ्या बरोबर नव्हती, तेव्हा पण हा नेहमीच माझ्याबरोबर राहिला. ती लोकं कशी असतात हे मला नाही माहित, पणमाझ्या मित्रावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
वीसच दिवसांनंतर माझा मित्र जेव्हा पाच लाखाचा चेक परत द्यायला आला, तेव्हा माझ्या ॲाफिसची ती मैत्रिण काही कारण सांगूनतेथून बाहेर गेली.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare