Thursday, January 30, 2020

मी हे करू शकतो का ? (मराठी)

माहित नाही दुसरे कधी कचरा करणं बंद करतील
मी स्वच्छता राखू शकतो का?

माहित नाही दुसरे कधी ट्रॅफिक रूल्स तोडणं बंद करतील
मी ट्रॅफिक रूल्स फाॅलो करू शकतो का?

माहित नाही दुसरे कधी द्वेष करणं सोडतील
मी प्रेम देऊ शकतो का?

माहित नाही दुसरे वाईटपणा कधी सोडतील
मी चांगुलपणा दाखवू शकतो का?

माहित नाही दुसरे धोका देणं कधी बंद करतील
मी इमानदारी दाखवू शकतो का?

माहित नाही दुसरे कधी वैर सोडतील
मी माझी मैत्री दाखवू शकतो का?

माहीत नाही दुसरे कधी सैतानीपणा सोडतील
मी माझी मानवता दाखवू शकतो का?

माहीत नाही दुसरे शंका घेणं कधी बंद करतील
मी विश्वास देऊ शकतो का?

माहित नाही दुसरे कधी दु: दूर करतील
मी आनंद पसरवू शकतो का?

माहित नाही समाज देश विश्व कधी बदलेल
पण मी स्वतबदलू शकतो का?


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 


#pramodplanet #pramodwaghmare 

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...