Wednesday, January 15, 2020

असं का होतं? (मराठी)

अमेरिकेत बघितलं होतंजेव्हा फ्लाईट लॅंड होतेतेव्हा पहिल्यांदा पुढच्या रो मध्ये बसलेले पॅसेंजर्स उभे राहतात आणि एका मागोमागएक लाईनमध्ये खाली उतरतातजो पर्यंत आपल्या समोरच्या रो मधील पॅसेंजर्स पुढे जात नाहीत तोपर्यंत आपल्या रो चे कोणताहीपॅसेंजर्स जागेवरून उठतही नाहीत.

युरोपात झेब्रा क्राॅसिंगवर जर कोणी रस्ता क्राॅस करत असेल तर आपल्याला आपले वाहन थांबवून त्या पादचाऱ्याला रस्ता क्राॅस करूद्यावा लागतोत्याच प्रमाणे सालकलस्वारासाठी सुद्धा थांबावे लागते.

तिथे कचरा डस्टबीनमधेच टाकावा लागतोमी बघितलंय जेव्हा कोणी आपले पाळीव प्राणी कुत्रे मांजरी घेऊन फिरत असतील तर त्याप्राण्याची विष्ठा त्या प्राण्याचा मालक ग्लोव्ज घालून साफ करतो आणि डस्टबीनमध्ये टाकतो.

आज माझी फ्लाईट लॅंड झाली आणि नेहमी प्रमाणे सर्व जण एकावेळेस उभे राहिलेत्यात खुप जण साॅफ्टवेअर कंपनीचे तरूण होते जेकाही काळासाठी का होईना पण परदेशात राहून आले आहेतफक्त तेच नाहीत पण आपण सर्व जेव्हा या देशांमध्ये राहतो तेव्हा तेथीलसर्व नियमांचे पालन करतोजेव्हा आपण आपल्या देशात परत येतेतेव्हा जसं काही आपण सर्व विसरून जातो.

माहित नाही असं का होतं.


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #pramodwaghmare

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...