Monday, January 20, 2020

मी सैतान (मराठी)

एक महिना झाला ती माझ्या डिव्हिजनला बदली होऊन आली होती आणि ती आल्या पासून माझ्या मनात वेडेवाकडे विचार चालू झाले

आता कंपनीत मी चांगली पोझिशन कमवली होतीगरिबीतून येऊनही गेली २० वर्षे कष्टाने मी इथपर्यंत पोहोचलो होतोमाझं कंपनीतमोठं नाव होतंएक नवीन मुलगी मला मिळत नाही या विचाराने माझा अहंकार दुखावला जात होता.

मी बरेच प्रयत्न केलेकधी केबिन मध्ये बोलावूनकधी हाॅटेलमध्ये डिनरचं इन्व्हिटेशन देऊनकधी मुद्दाम जास्त काम देऊनमी कंपनीततिचं चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतोहे तिला कळत नव्हतं कापण ती नेहमी हसतअतिशय संयमानेआदराने मलानकार देत होतीत्यामुळे माझा राग आता अनावर होऊ पहात होताकोण ती किरकोळ मुलगी आणि मला नाही म्हणतेमी डिस्टर्ब होऊलागलोघरी बायकोने पण मला विचारलेमी तिला टाळले.

आज मात्र तिने मला रात्री घरी जेवायला बोलावलेमी रात्री तिच्या घरी गेलो

वेलकम सर.” हसत तिने माझं स्वागत केलंमी सोफ्यावर बसलो तशी ती म्हणाली,” सरएक सरप्राईज आहेतुम्हाला कोणाशी भेटघालून द्यायची होती.” आणि तिने हाक मारली,” काकासर आलेत.”

त्याबरोबर दरवाजातून एक वयस्कर जोडपं बाहेर आलंत्यांना बघून माझ्या हातातला पाण्याचा ग्लास मी झटकन खाली ठेवलामलाकाॅलेजसाठी त्या वेळी पैसे नव्हते तेव्हा त्या दोघांनी खुप प्रेमाने माझ्या काॅलेजचा खर्च उचलला होतामी जे शिक्षण करू शकलो तेफक्त आणि फक्त त्यांच्यामुळेचमी नंतर कधीच त्यांना भेटलो नव्हतो.

मी झटकन दोघांच्या पाया पडण्यासाठी वाकलोतिचे शब्द माझ्या कानावर पडत होते,” सरकाकांनी नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीमला सांगितल्याकसं गरिबीतून कष्टाने तुम्ही एवढे मोठे झालात मला नेहमी सांगततुम्ही माझे रोल माॅडेल आहात सर.”

ती बोलत होती आणि मला समजत होतं की सत्ता आणि पैशाबरोबर मी किती मोठा सैतान झालो आहे तेमाझ्या अश्रुंनी त्यांचे पायओले झालेत्या दोघांनी मला वर उचललं आणि आपल्या मिठीत घेतलं...


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare 


#pramodplanet #pramodwaghmare #MeToo #metoo

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...